Join us  

केस धुतल्यानंतर अख्खा दिवस खूप गळतात? ५ चुका टाळा, केस मजबूत होतील- गळणंही थांबेल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2023 9:05 AM

Hair Fall After Hair Washing : हेअर वॉशच्या १ किंवा २ तास आधी तेल गरम करून  कोमट तेल टाळूवर लावून मसाज करा.

हेअर फॉलची समस्या आजकाल प्रत्येकालचा उद्भवते. केस गळणं खूपच कॉमन आणि नैसर्गिक आहे. वाढत्या वयात सगळ्यांचेच केस गळतात. केस गळून कपाळ मोठं दिसतंय, टक्कल पडलंय असंही अनेकांच्या बाबतीत होतं. (Hair falls out a lot when washing hair) खासकरून जेव्हा महिला केस धुतात तेव्हा केस जास्त गळतात. केसांचे पुंजके तुटून हातात येतात. अशावेळी केस गळती कशी थांबवायची हात प्रश्न पडतो. केस गळण्याशी संबंधित काही गैरसमजून आधी दूर करायला हवेत. (Tips To Reduce Hair Fall While Shampooing)

केस धुताना केस गळू नये यासाठी काय करायचं?

हेअर वॉशच्या १ किंवा २ तास आधी तेल गरम करून  कोमट तेल टाळूवर लावून मसाज करा. मसाज केल्यानंतर केसांना स्टिम द्या. जेणेकरून तेल केसांच्या मुळांपर्यंत पोहोचेल. स्टिमिंगसाठी तुम्ही स्टिमर किंवा गरम पाणी वापरू शकता. मग केस ओले करा. त्यानंतर केस शॅम्पू आणि कंडिशनरनं स्वच्छ धुवा.

केसांच्या लांबीला कमी शॅम्पू लावा. केस धुतल्यानंतर एलोवेरा हेअर कंडीशनर तुम्ही लावू शकता. २ ते ३ मिनिटं कंडिशनर लावल्यानंतर केस स्वच्छ पाण्यानं धुवा. हेअर ड्रायरच्या वापरानं केस कमकुवत होण्याची भिती असते. म्हणून केस नैसर्गिकरित्या सुकवा. केस विंचरण्यासाठी जाड दातांच्या लाकडाच्या कंगव्याचा वापर करा. यामुळे केस गळणं कमी होतं. 

खरंच शॅम्पू लावल्यानं केस गळतात का?

शॅम्पू लावल्यानं केसांमधील इसेंशियल ऑईल निघून जातं आणि केस गळतात यात काही तथ्य नाही. खरं पाहतात शॅम्पू लावल्यानं स्काल्प स्वच्छ होतो आणि केसही चांगले राहतात.

व्हिटामीन ई टॅब्लेटनं केस गळणं थांबतं?

व्हिटामीन्स हेअर फॉल थांबवतात हे पूर्णपणे खरे नाही. जेव्हा केसांमध्ये पोषक तत्वांची कमतरता असते. तेव्हा व्हिटामीन सर्व केस पुन्हा वाढवू शकतात. जास्त प्रमाणात व्हिटॅमिन-ई घेतल्याने केस जास्त गळण्याचीही भिती असते.

जास्त ताण घेतल्यानं केस गळतात?

टेंशन घेतल्यानं केस गळतात. कारण त्याचा परिणाम केसांच्या नैसर्गिक वाढीच्या चक्रावर होतो. पण केस गळण्याचे हे एकमेव कारण नाही. आनुवंशिकता, हार्मोनल असंतुलन, पौष्टिक कमतरता यामुळे देखील होऊ शकते.

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स