दिवसभराचा थकवा, ताण-तणाव आणि प्रदूषणामुळे केस गळण्याची समस्या उद्भवते. वेळेअभावी लोक आपल्या केसांची व्यवस्थित काळजी घेऊ शकत नाहीत आणि ही समस्या वाढत जाते. (Kes vadhvnyasathi upay sanga) जर तुमचे केस धुताना किंवा विंचरताना खूप गळत असतील तर याचा अर्थ असा की तुम्ही जे तेल किंवा शॅम्पू वापरत आहात त्याचा परिणाम दिसून येत आहे. (Hair Mask for thick hairs) केसांना दाट आणि काळेभोर बनवण्यासाठी तुम्ही भृंगराजचा आपल्या हेअर केअर रूटीनमध्ये समाविष्ट करू शकता. यामुळे केस मजबूत होण्याबरोबरच केसांची चांगली वाढही होते. हेअर मास्क (Hair Mask)घरच्याघरी कसा तया करायचा ते पाहू. (How to Make Hair Mask at Home)
1) भृंगराज आणि आवळ्याचा हेअर मास्क (Bhringraj and Amla)
केसांच्या वाढीसाठी सगळ्यात आधी एक वाटी घ्या त्यात २ चमचे भृंगराज आणि २ चमचे आवळा पावडर घालून मिक्स करा. नंतर थोडं थोडं पाणी मिसळून याची पेस्ट तयार करा. नंतर ही पेस्ट हेअर स्काल्प आणि केसांन लावा. अर्ध्या तासासाठी तसंच सोडून द्या. नंतर शॅम्पूने केस धुवा. २ ते ३ वेळा हा उपाय केल्यास केस मजबूत आणि सुंदर दिसतील.
2) भृंगराज आणि दह्याचा हेअर मास्क (Bhringraj and Curd)
केसांना मऊ, मुलायम आणि मजबूत बनवण्यासाठी एका वाटीत २ ते ३ चमचे भृंगराज पावडर घ्या त्यात दही मिसळा याची पेस्ट तयार करून काही वेळासाठी तसंच सोडून द्या. तयार आहे भृंगराज हेअर मास्क, तुम्ही हा मास्क केसांच्या मुळांना व्यवस्थित लावून घ्या. अर्ध्या तासाने केस शॅम्पूने व्यवस्थित धुवा.
३) भृंगराज आणि नारळाचा हेअर मास्क (Bhringraj and Coconut Oil)
एका वाटीत ३ ते ४ चमचे भृंगराज पावडर घ्या आणि त्यात कोमट तेल घालून पेस्ट तयार करा. नंतर केसांच्या मुळांना ही पेस्ट लावून मालिश करा. चांगल्या परिणामांसाठी रात्रभर केसांना लावलेले राहू द्या नंतर सकाळी शॅम्पूने केस धुवून घ्या. यामुूळे केसांची वाढ चांगली होण्यास मदत होईल.