Lokmat Sakhi >Beauty > रोज गळून केस पातळ झाले? सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी सांगितला दाट केसांसाठी खास उपाय

रोज गळून केस पातळ झाले? सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी सांगितला दाट केसांसाठी खास उपाय

Hair Fall Control Tips (Kes galti var upay in marathi) : नवीन केसांची वाढ होण्यासाठी फक्त शॅम्पू, तेल वापरून चालत नाही तर तुमचा आहार चांगला असणंसुद्धा गरजेचं असतं.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 03:54 PM2023-10-02T15:54:21+5:302023-10-02T18:31:51+5:30

Hair Fall Control Tips (Kes galti var upay in marathi) : नवीन केसांची वाढ होण्यासाठी फक्त शॅम्पू, तेल वापरून चालत नाही तर तुमचा आहार चांगला असणंसुद्धा गरजेचं असतं.

Hair Fall Control Tips : Sadhguru jaggi vasudev suggest tips for faster hair growth | रोज गळून केस पातळ झाले? सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी सांगितला दाट केसांसाठी खास उपाय

रोज गळून केस पातळ झाले? सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी सांगितला दाट केसांसाठी खास उपाय

महिला असो किंवा पुरूष केस गळण्याच्या समस्येचा सामना प्रत्येकालाच करावा लागतो. रोजच्या केस गळतीमुळे स्काल्प दिसायला सुरूवात होते आणि टक्कल पडेल की काय अशी भिती प्रत्येकाच्याच मनात असते. (Hair Care Tips) नवीन केसांची वाढ होण्यासाठी फक्त शॅम्पू, तेल वापरून चालत नाही तर तुमचा आहार चांगला असणंसुद्धा गरजेचं असतं. बरेच लोक वेळेवर जेवत नाहीत. जेवणात पोषक घटकांचा अभाव असतो. (kes galti var gharguti upay)

सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी केसांच्या वाढीसाठी आणि नवीन केस उगवण्यासाठी काही सोपे उपाय सांगितले आहेत. हे उपाय केल्यास तुम्हाला कोणत्याही महागड्या पार्लर ट्रिटमेंट्स न घेता सकारात्मक बदल जाणवेल. कमी खर्चात हा उपाय केल्याने  केस गळती कमी होईल आणि केसांची वाढ चांगली होईल. (Hair Growth Tips)

हेअर फॉल थांबवण्यासाठी काय करावे असा प्रश्न विचारल्यानंतर सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी काय उत्तर दिलं त्याचा व्हिडिओसुद्धा व्हायरल होत आहे. साऊथचा अभिनेता विजय देवरकोंडा याने त्यांना विचारले की जर केस गळण्यााची समस्या असेल तर हे कसं टाळता येईल? यावेळी ते म्हणाले डोकं शांत ठेवलं तर तुमच्या अनेक समस्या टळळतील. हा उपाय खूपच साधा, सोपा आहे. सतत चिडचिड करण्यापेक्षा मन शांत ठेवा ज्यामुळे अनेक समस्या टळतील.

आवळा

केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी आवळा फायदेशीर ठरतो. आवळ्यामुळे केसांच्या वाढीस प्रोत्साहन मिळते. आवळा पावडरमध्ये शिकेकाई आणि रिठा घालून याची पेस्ट बनवून तुम्ही केसांना लावू शकता. ही पेस्ट लावल्यानंतर सुकू द्या. त्यानंतर केस पाण्याने स्वच्छ धुवा. काही दिवसातच तुम्हाला फरक दिसून येईल.

चमचाभर दह्याने घरी करा फेशियल, ५०० ते हजार रूपये वाचतील-पार्लरशिवाय चेहरा दिसेल ग्लोईंग

मेथी

मेथी केस गळतीची समस्या टाळण्यासाठी गुणकारी ठरते. मेथीत एंटी ऑक्सिडंट्स असतात. यामुळे केस वाढतात. यासाठी रात्रभर मेथीचे दाणे पाण्यात भिजवून ठेवा. दुसऱ्या दिवशी मेथीचे दाणे बारीक करून घ्या. यात एक चमचा लिंबाचा रस आणि नारळाचं तेल मिसळा. ही पेस्ट केसांच्या मुळांना लावा. सुकल्यानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवा. 

कांद्याचे साल फेकून देता? केसांना ‘असे’ लावा कांद्याचे साल-डाय न करता काळे होतील केस

कांद्याचा रस

कांद्याचा रस हेअर फॉल कंट्रोलसाठी फायदेशीर ठरतो.  कांद्याच रस वाटून  त्याचा रस काढून केसांच्या मुळांना लावा. अर्ध्या तासाने  केस स्वच्छ पाण्याने धुवा. हा उपाय केल्यास केसांची वाढ चांगली होण्यास मदत होईल.

Web Title: Hair Fall Control Tips : Sadhguru jaggi vasudev suggest tips for faster hair growth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.