Join us  

केस गळणं खूप वाढलंय? दाट, काळ्याभोर केसांसाठी तेलात 'हा' पदार्थ मिसळून लावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 2:03 PM

Hair Fall Control Tips : 1-2 चमचे बदाम तेल कोमट करा आणि संपूर्ण टाळूवर लावा. काही मिनिटं आपल्या बोटांनी टाळूला हळूवारपणे मालिश करा.

गळणाऱ्या केसांमुळे बहुतांश लोक त्रस्त असतात. (How to control Hair fall) ही समस्या इतकी सामान्य झाली आहे की ती प्रत्येक माणसामध्ये आढळते. आवळा केसांसाठी किती फायदेशीर आहे याविषयी खूप कमी जणांना माहीत आहे. जर तुम्ही सर्व काही करून बघितले असेल पण काही फायदा होत नसेल तर बदामाचं तेल आणि आवळा एकदा नक्की करून पाहा. (Home remedies for hair fall control) हा एक आयुर्वेदिक टू स्टेप फॉर्म्युला आहे, ज्याचा वापर केल्याने तुमचे केस गळणे थांबेल आणि त्यासोबत नवीन केसही वाढू लागतील. ते कसे बनवा (Hair care Tips)

बदाम तेल

1-2 चमचे बदाम तेल कोमट करा आणि संपूर्ण टाळूवर लावा. काही मिनिटं आपल्या बोटांनी टाळूला हळूवारपणे मालिश करा. केसांच्या लांबीलाही थोडेसे तेल लावा. रात्रभर तसंच राहू द्या. दुसऱ्या दिवशी सकाळी सौम्य शाम्पूने धुवा. आपण आठवड्यातून 1 किंवा 2 वेळा हा उपाय वापरू शकता

बदामाचं तेल आणि आवळा

एक चमचा आवळा पावडर घ्या आणि त्यात आवश्यक प्रमाणात बदाम तेल मिसळून पेस्ट बनवा. ते तुमच्या टाळूवर लावा, तुमच्या बोटांनी हलक्या हाताने मसाज करा. तासभर तसंच राहू द्या. त्यानंतर सौम्य शाम्पूने धुवा. तुम्ही हा मास्क आठवड्यातून 1 किंवा 2 वेळा वापरू शकता.

बदामाचे तेल आणि लिंबाचा रस

एका भांड्यात २ चमचे बदामाचे तेल घ्या आणि त्यात २ चमचे ताजे लिंबाचा रस घाला. ते एकत्र मिसळा आणि संपूर्ण टाळू तसेच केसांना लावा. तुमच्या बोटांनी, टाळूला 5-6 मिनिटे मसाज करा आणि नंतर 20-30 मिनिटे राहू द्या. त्यानंतर सौम्य शाम्पूने धुवा. आपण आठवड्यातून 1 ते 2 वेळा हा उपाय करू शकता

बदामाचं तेल आणि कांदा

एक मध्यम आकाराचा कांदा घ्या. तो किसून त्याचा रस काढा. एका भांड्यात कांद्याचा रस काढा. त्यात दोन चमचे बदामाचे तेल घालून मिक्स करा. हे मिश्रण केसांवर आणि टाळूवर लावा आणि हलक्या हातांनी काही मिनिटे चांगले मसाज करा. 30-40 मिनिटे केसांवर राहू द्या आणि नंतर सौम्य शॅम्पूने केस धुवा. आपण आठवड्यातून 1 किंवा 2 वेळा हा उपाय करू शकता.

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी