Join us  

केसांचं गळणं, कोंडा आणि पांढरे केस.. 3 समस्या, 1 उपाय, असं बनवा हेअर ऑईल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2021 7:17 PM

Hair care solution: केसांचं गळणं (Hair fall), सततचा कोंडा (dandruff) आणि केसांचं अकाली पांढरं होणं (gray hair), थांबवायचं असेल तर हे हिवाळा स्पेशल हेअर ऑईल (home made hair oil) वापरा.. घरच्या घरी तयार करा. अगदी सोप्पं आहे..

ठळक मुद्देआठवड्यातून दोनदा हे तेल लावून मसाज करा.तेल गाळून घेतल्यावर जे मिश्रण गाळणात उरेल ते टाकून देऊ नका. त्याचा स्क्रब म्हणून उपयोग करा. 

हिवाळ्यात केस, त्वचा (hair care tips for winter) या सगळ्यांचेच अगदी हाल- बेहाल होऊन जातात. केस तर खूप कोरडे, ड्राय (dry hair) होतातच पण अनेक जणींना या दिवसांत कोंड्याची समस्याही खूपच छळते. केसांत खूप जास्त कोंडा होतो. इतका की अगदी भांग बदलून पाडायची देखील भीती वाटते. कारण लगेच डोक्यातला लपलेला कोंडा वर येतो. डोक्यात कोंडा वाढला की साहजिकच केस देखील जास्त गळू लागतात. हे सगळे त्रास थांबवायचे असतील, तर हिवाळा स्पेशल हेअर ऑईल (how to make hair oil at home) घरीच तयार करा.

 

आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर (Rujuta Divekar) या सोशल मिडियावर (social media) खूप जास्त ॲक्टीव्ह असतात. त्यांनी त्यांच्या इन्स्ट्राग्रामवर (instagram) नुकताच एक व्हिडियो शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी आपल्या केसांसाठी घरच्या घरी पोषक तेल कसं बनवायचं हे सांगितलं आहे. यामध्ये त्यांनी जे पदार्थ वापरले आहेत, ते देखील अगदी सहज आपल्याला मिळण्यासारखे आहेत. शिवाय तेल तयार करण्याची त्यांनी दाखवलेली पद्धतही अतिशय सोपी आहे. म्हणूनच तर या अगदी सोप्या पद्धतीने (home remedies for hair) तेल बनवून बघायला आणि काही दिवस वापरून पहायला काहीच हरकत नाही.( how to make hair oil at home in Marathi)

 

हेअर ऑईल बनविण्यासाठी लागणारं साहित्यingredients for making hair oilजास्वंदाची २० फुलं, कडुलिंबाची ३० पानं, कढीपत्त्याची ३० पानं, पाच लहान कांदे, मेथीचे दाणे १ टीस्पून, कोरफडीचं एक पान, चमेलीची १५- २० फुलं, नारळाचं तेल १ लीटर.कसं करायचं हेअर ऑईलHow to make hair oil?- हेअर ऑईल बनविण्यासाठी तर सगळ्यात आधी मेथीचे दाणे पाण्यात अर्धा तास भिजत ठेवा.- कोरफड लहान आकारात कापून घ्या.- त्यानंतर भिजवलेल्या मेथ्या, कोरफड आणि वरचं सगळं साहित्य एकत्र करून वाटून घ्या. - एकीकडे गॅसवर नारळाचं तेल गरम करायला ठेवा.

- तेल गरम होत आलं की त्यात हे सगळं वाटण टाका.- कमी गॅसवर हे तेल ३० ते ४५ मिनिट उकळू द्या.- हळूहळू तेलाचा रंग बदलेल आणि आतलं सगळं वाटण कडक, कुरकुरीत होऊन जाईल.- त्यानंतर गॅस बंद करा.- तेल थंड झाल्यावर गाळून घ्या आणि काचेच्या बाटलीत भरून ठेवा. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीथंडीत त्वचेची काळजी