Hair fall Home Remedie : हिवाळ्यात अनेकांना केसांसंबंधी वेगवेगळ्या समस्या होत असतात. यात केसगळतीची समस्या जास्तीत जास्त लोकांना होते. मग लोक केसगळती रोखण्यासाठी वेगवेगळे उपाय करतात. पण काहींना फायदा मिळतो तर काहींना नाही. केमिकल्सच्या वापरानेही केसगळती अधिक वाढते. अशात आज आम्ही तुम्हाला पांढरे केस काळे करण्याचा आणि केसगळती थांबवण्याचा एक घरगुती उपाय सांगणार आहोत. या उपायाच्या मदतीने केसगळती तर थांबेलच, सोबतच केस चमकदार आणि मजबूतही होतील.
खोबऱ्याच्या तेलात कढीपत्ता
खोबऱ्याचं तेल आणि कढीपत्त्याच्या मिश्रणाने केसगळती तर थांबेलच सोबतच पांढरे झालेले केस पुन्हा काळे करण्यासही मदत मिळेल. यासाठी एका वाटीमध्ये थोडं खोबऱ्याचं तेल गरम करा. त्यात १० ते १२ कढीपत्त्याची पाने टाका. कढीपत्ता काळा झाल्यावर गॅस बंद करा. थोड्या वेळाने हे तेल थंड झाल्यावर डोक्याच्या त्वचेवर लावा. काही दिवस हा उपाय केल्यावर तुमचे केस पुन्हा काळे होतील. सोबतच मजबूतही होतील.
कढीपत्याची पाने केसांवर लावण्याचे अनेक फायदे असतात. याने केस चमकदार होतात. केसांना तोंड फुटण्याची समस्याही याने दूर होते. इतकंच नाही तर डोक्याच्या त्वचेवर इन्फेक्शनचा धोकाही कमी होतो. डोक्याच्या त्वचेला पोषण मिळतं आणि डॅमेज झालेले केस रिपेअर होतात. केस पांढरे होण्याची समस्याही दूर होते.
खोबऱ्याचं तेल आणि लिंबाचा रस
अनेकदा खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि केमिकलच्या वापरामुळे केस पांढरे होऊ लागतात. त्यामुळे ते लगेच ठीक केले जाऊ शकत नाहीत. पांढरे केस काळे करण्यासाठी खोबऱ्याच्या तेलात लिंबाचा रस मिक्स करा आणि केसांच्या मुळात लावा. केसांच्या मुळात या तेलाने चांगली मालिश करा. लिंबाच्या रसात अॅंटी-ऑक्सिडेंट असतात, जे ऑक्सिडेटिव स्ट्रेस दूर करण्यास मदत करतात. हे मिश्रण आठवड्यातून चार वेळा वापरा.
हे मिश्रण तयार करण्यासाठी एका वाटीत खोबऱ्याचं तेल घ्या आणि त्यात लिंबाचा रस मिक्स करा. साधारण १ तासानंतर हे तेल केसांच्या मुळात लावा, चांगली मालिश करा. काही दिवस ही क्रिया केल्यावर लवकरच पांढरे केस काळे होऊ लागतील.