केस गळण्याची समस्या उद्भवणं खूपच कॉमन आहे. (Hair Fall Solution) केस गळतीपासून सुटका मिळवण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करतात तरीसुद्धा केसांचं गळणं थांबत नाही. केस तुटणं केस गळणं लाईफस्टाईलशी संबंधित अनेक चुकांचे कारण ठरते. खाण्यापिण्यात कॅल्शियम, व्हिटामीन, प्रोटीन्स यांसारख्या पोषक तत्वांचा अभाव असल्यास हेअर प्रोब्लेम्स होतात. याव्यतिरिक्त डॉक्टर प्रियांका यांनी काही घरगुती उपाय सांगितले आहेत, ज्याबाबत या लेखात समजून घेऊ. (Home Remedies For Hair Fall Control)
हेअर फॉल कंस थांबवावे (How To Stop Hair Fall)
1) डॉक्टर आपल्या व्हिडीओमध्ये सांगतात की सगळ्यात आधी आपल्या डाएटमध्ये प्रोटीन्सयुक्त पदार्थांचा समावेश करा.
2) याव्यतिरिक्त १ लिटर पाण्यात १ मोठा चमचा मेथीच्या बीया मिक्स करून रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. त्यानंतर सकाळी या बॉटलमधलं पाणी अर्ध करा.
3) उरलेलं पाणी संपूर्ण दिवसभरात तुम्ही एक-एक सिप करून पिऊ शकता, ज्यामुळे हेअर ग्रोथ चांगली होईल आणि केस दाट, लांब होतील.
पोट लटकतंय, मांड्यांचा आकार वाढला? किचनमधले २ पदार्थ पाण्यात घालून घ्या-भराभर कमी होईल वजन
हेअर फॉल थांबवण्याचे इतर काही उपाय (Hair Care Tips How To Stop Hair Fall)
4) एलोवेरा जेलमध्ये नारळाचं तेल मिसळून केसांना लावा. ज्यामुळे केसांची वाढ चांगली होईल. केस मऊ-मुलायम आणि दाट राहण्यास मदत होईल. एक छोटा तुकडा आल्याचा रस केसांच्या वाढीच्या दृष्टीने चांगला ठरेल.
5) यात तुम्ही एलोवेराल जेल मिसळून १० ते १५ मिनिटं केसांना अप्लाय करा. ताजं एलोवेरा जेलसुद्धा तुम्ही केसांना लावू शकता. १० मिनिटं हे जेल केसांना लावून नंतर हेअर वॉश करा. त्यानंतर पाहा तुमचे केस मऊ-मुलायम झालेले दिसून येतील.