प्रत्येक ऋतूत केसांची योग्य काळजी घेणं आवश्यक असतं. पावसाळ्याच्या दिवसात काही हेअर केअर टिप्स फॉलो करून तुम्ही केसांची योग्य काळजी घेऊ शकता. (Hair Fall in monsoon Solution) पावसाळ्यात मॉईश्चर जमा होणं, घाम येणं यामुळे केस गळण्याबरोबरच डॅड्रफ आणि कोरडेपणाची समस्या उद्भवते. अशात नॅच्युरल हेअर मास्क तुमचं काम सोपं करू शकतो.(Natural hair mask)
दही आणि कांद्याचा हेअर मास्क
केसांना दही आणि कांद्याचा हेअर मास्क लावल्यास डॅड्रफ आणि खाजेवरही आराम मिळतो. याशिवाय केस हेल्दी आणि शायनी राहतात. केसाचं तुटणं कमी होणं, २ मोठे चमचे दही घ्या त्यात ५ ते ६ चमचे कांद्याचा रस मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट स्काल्पला लावून केसांवर व्यवस्थित लावा आणि अर्ध्या तासासाठी तसेच सोडून द्या नंतर सामान्य शॅम्पून केस स्वच्छ धुवा.
केळी आणि पपईचा हेअर मास्क
केस तुटणं आणि केसांना फाटे फुटणं ही समस्या टाळण्यासाठी पपईचा हेअरमास्क तुम्ही लावू सकता. यासाठी २ मोठे चमचे पपईचा गर आणि २ चमचे केळ्याच गर व्यवस्थित एकत्र करा. या पेस्टमध्ये व्हिटामीन ई ची कॅप्सूल घाला. नंतर पेस्ट केसांना लावून अर्ध्या तासासाठी तसेच सोडून द्या. यात व्हिटामीन ई च्या कॅप्सूलचं तेल घाला नंतर केसांना लावून अर्ध्या तासासाठी तसेच सोडून द्या. नंतर साध्या शॅम्पूनं केस स्वच्छ धुवा.
मेथी हेअर मास्क
केसांना मेथी लावण्याचे अनेक गुणकारी फायदे आहेत. मेथीमुळे केसाचं गळणं कमी होतं. चार ते पाच मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवून द्या. सकाळी हे दाणे वाटून पेस्ट तयार करा. या पेस्टमध्ये १ मोठा चमचा दही आणि १ चमचा कॅस्टर ऑईल मिक्स करा आणि स्काल्पवर हलक्या हातानं मसाज करा. केसांच्या लांबीवरही लावा अर्धा तास तसेच लावलेले राहू द्या. नंतर केस स्वच्छ धुवा.
शिकेकाई हेअर मास्क
शिकेकाई केसांना मुळापासून मजबूत बनवते. याशिवाय डँड्रफपासूनही सुटका मिळते. २ चमचे शिकेकाई पावडर एक चमचा दह्यात मिसळून ही पेस्ट केसांच्या मुळांना लावा आणि काहीवेळ स्काल्पची मसाज करा. अर्ध्या तासानं केस स्वच्छ धुवा. आयुर्वेदीक गुणांनी परिपूर्ण शिकेकाई व्हिटामीन ए, सी, डी आणि व्हिटामीन ई नी परिपूर्ण असतो.
आवळा आणि लिंबाचा हेअर पॅक
केसांना मजबूत बनवण्यासाठी चमक आणि ग्रोथसाठी तुम्ही आवळा आणि लिंबाचा हेअर पॅक वापरू शकता. यासाठी ३ चमचे आवळा पावडरमध्ये थोडं पाणी आणि २ चमचे लिंबाचा रस मिसळून बारीक पेस्ट तयार करा. ही पेस्ट स्काल्पला लावून अर्ध्या तासासाठी केस तसेच ठेवा. त्यानंतर साध्या पाण्याने केस स्वच्छ धुवा.