Join us  

केस खूप गळत आहेत, नेहमीच्याच शाम्पूमध्ये टाका फक्त २ गोष्टी, केस होतील मजबूत, दाट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2022 3:27 PM

How To Stop Hair fall: केस गळण्याची समस्या अनेकांना छळत आहे. हा त्रास कमी करण्यासाठी हा एक सोपा घरगुती उपाय करून बघा..

ठळक मुद्देहा उपाय करण्यासाठी तुम्हाला खूप काही वेगळं करण्याची गरज नाही. तुम्ही नेहमी जो शाम्पू वापरता तोच शाम्पू वापरायचा आहे. फक्त ....

काहीही करा केसांचं गळणं काही थांबतच नाही, अशी अनेकांची तक्रार असते. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे एकतर आपला आहार व्यवस्थित नसतो. दुसरं म्हणजे अनेक जणांना व्यायामाचा कंटाळा असतो आणि तिसरं म्हणजे एखादा उपाय सुचविल्यावर आपण तो सातत्याने करत नाही. त्या उपायाचे फायदे दिसू लागण्याची वेळ येते आणि नेमकं तेव्हाच आपण तो उपाय करून सोडून देतो. म्हणूनच आता हा एक उपाय करून बघा. 

 

हा उपाय करण्यासाठी तुम्हाला खूप काही वेगळं करण्याची गरज नाही. तुम्ही नेहमी जो शाम्पू वापरता तोच शाम्पू वापरायचा आहे. फक्त त्यामध्ये कॉफी पावडर आणि ॲलोव्हेरा जेल अशा २ गोष्टी टाकायच्या आहेत. या दोन्ही गोष्टी तुमच्या केसांचं गळणं कमी करण्यासाठी मदत करतात. कारण या दोन्ही गोष्टी केसांना मजबूत करतात. केसांची मुळं पक्की झाली की आपोआपच केसांचं गळणं कमी होतं आणि चांगली वाढ होऊ लागते. हा उपाय इन्स्टाग्रामच्या mysha_beauty_queen या पेजवर शेअर करण्यात आला आहे. हा उपाय आठवड्यातून एकदा करावा, असं त्यात सांगितलं आहे.

 

केसांसाठी कोरफडीचे फायदे - कोरफडीच्या वापरामुळे केसांचा पोत सुधारण्यास मदत होते.- केसांमधला कोंडा कमी करण्यासाठी कोरफड उपयुक्त ठरते.- केसांच्या चांगल्या वाढीसाठी कोरफडीमध्ये असणारे औषधी गुणधर्म उपयुक्त ठरतात.

 

केसांसाठी कॉफीचे फायदे - कॉफीमुळे डोक्याच्या त्वचेची पीएच लेव्हल संतुलित राहण्यास मदत होते.- काॅफी हा डोक्याच्या त्वचेसाठी एक उत्तम स्क्रब आहे. - केस जाड आणि मजबूत होण्यासाठी काॅफीमधले घटक अधिक उपयुक्त ठरतात.

 

अशा पद्धतीने धुवा केस१ टेबलस्पून शाम्पू, १ टेबलस्पून काॅफी पावडर आणि २ टेबलस्पून ॲलोव्हेरा जेल हे पदार्थ एका बाऊलमध्ये एकत्र करा. त्यात थोडंसं पाणी टाका. सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या. मिश्रण हलवताना आपोआपच त्याचा फेस होईल. आता केस धुण्याआधी ते ओले करा. ओल्या केसांवर हे मिश्रण टाका आणि हलक्या हाताने स्काल्पला मसाज करा. मसाज करताना बोटाच्या टोकांनी मसाज करावा. त्यानंतर केस स्वच्छ धुवून टाका. हा उपाय महिनाभर नियमित केल्यास नक्कीच केसांवर चांगला परिणाम दिसून येईल.

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी