केसांना योग्य पोषण मिळालं नाही किंवा केसांची काळजी घेण्यात आपण कुठे कमी पडलो तर केसांचं गळणं सुरु होतं.. केसांची मुळे कमजोर होणं.. केस अशक्त (weak hair problems) असणं ही केसगळतीची काही प्रमुख कारणे आहेत. त्यामुळेच केसांची मुळे पक्की करण्यासाठी आणि केसांचं आरोग्य सुधारण्यासाठी त्यांना अधूनमधून योग्य हेअरपॅक किंवा हेअरमास्क लावण्याची गरज असते.
म्हणूनच तर केस गळतीची समस्या कमी करण्यासाठी हा एक सोपा उपाय करून बघा.. या ब्यूटी टिप्सइन्स्टाग्रामच्या ruchita.ghag या पेजवर शेअर (instagram share) करण्यात आल्या आहेत. प्रत्येक घरात अगदी सहज उपलब्ध असणारे पदार्थ वापरून केसांसाठी पोषक ठरणारा हेअरमास्क कसा बनवायचा, हे या व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे. हा हेअरमास्क लावल्यामुळे केसांची मुळे पक्की होऊन केस गळती कमी होईल. तसेच केस चमकदार आणि सिल्की होण्यास मदत होईल.
कसा करायचा हेअरमास्क?
- हेअरमास्क बनविण्यासाठी कढीपत्त्याची पाने अर्धीवाटी घ्या. पाने धुवून स्वच्छ करून घ्या.
- यानंतर यामध्ये एक वाटी दही आणि दोन ते तीन टीस्पून खोबरेल तेल टाका.
- हे तिन्ही पदार्थ मिक्सरमध्ये टाकून त्याची चांगली बारीक पेस्ट करा.
- ही पेस्ट गाळणीने गाळून घ्या. केसांसाठी कढीपत्ता हेअर मास्क झाला तयार..
कसा लावायचा हेअरमास्क?
- हा हेअरमास्क केसांच्या मुळाशी तसेच केसांच्या संपूर्ण लांबीवर लावा.
- सगळ्या केसांना व्यवस्थित लावून झाल्यानंतर केस बांधून टाका.
- यानंतर अर्ध्या तासाने केस धुवून टाका.