Join us  

Hair Fall Solution : फक्त ८ दिवसात केसांचं गळणं होईल कमी; दाट केसांसाठी रामदेव बाबांनी सांगितले खास ७ उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2022 4:40 PM

Hair Fall Solution : केसगळतीमुळे त्रासलेल्या अशा लोकांसाठी बाबा रामदेव यांनी सांगितलेले काही उपाय रामबाण उपाय ठरू शकतात.

केस गळणं, केस पांढरे होणं सध्या खूपच कॉमन झालंय. केसांची समस्या टाळण्यासाठी कोणी महागडे शॅम्पू विकत घेतं तर कोणी पार्लरच्या ट्रिटमेंट्स करतं. (Hair Fall Solution) केसगळतीमुळे त्रासलेल्या अशा लोकांसाठी बाबा रामदेव यांनी सांगितलेले काही उपाय रामबाण उपाय ठरू शकतात. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या टिप्स फॉलो करणे खूप सोपे आहे. हे उपाय करण्याबरोबरच तुम्हाला योग्य आहार आणि व्यायामाकडेही लक्ष द्यावं लागेल.

विशेषत: महिलांसाठी केस गळण्याची  समस्या त्रासदायक ठरते. (Baba ramdev simple ways and tips to prevent hair fall within 7 days) केसगळतीमुळे त्रासलेल्या अशा लोकांसाठी बाबा रामदेव यांनी सांगितलेले काही उपाय रामबाण उपाय ठरू शकतात. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या टिप्स फॉलो करणे खूप सोपे आहे. याचा अर्थ तुम्ही कोणतेही प्रयत्न न करता केसगळतीपासून मुक्त होऊ शकता.

त्यांच्या एका व्हिडिओमध्ये, योगगुरूंनी असे महागडे शॅम्पू आणि कंडिशनर्स विकत घेऊ नका आणि वापरू नका असा सल्ला दिला आहे. त्यांनी याआधी डोक्याला मोहरीचे तेल, खोबरेल तेल किंवा दही  लावले होते, त्यामुळे केस आजपर्यंत मजबूत राहतात याची आठवण करून दिली. त्यांनी सर्वांना कृत्रिम तेल न लावण्याचा सल्ला दिला आणि त्याला 'विष' म्हटले.

हेअर फॉल रोखण्याचे उपाय

१) सगळ्यात आधी ५ मिनिट बोटांची नखं एकमेकांना घासा.  जर तुम्ही  उच्च रक्तदाबाचा त्रास नसेल तर २ ते ५ मिनिटं शीर्षासन किंवा सर्वांगासन करू शकता. हे केसांसाठी खूप फायदेशीर ठरते.

२) आवळा चुर्ण आणि च्यवनप्राशनचे सेवन करा. केसांच्या वाढीसाठी हे खूप फायदेशीर ठरते.  

३) दुधीचा रस आणि आवळ्याचा रस नियमित प्यायल्याने आठवडाभरात केसगळती थांबते.

४) रामदेव बाबांनी  केस धुण्याच्या एक दिवस  रात्री केसांना तेल लावण्याचाही सल्ला दिला आहे. 

५) रामदेव बाबांनी सांगितले की केस धुण्यासाठी दही किंवा आंबट ताक वापरता येते. की त्यांचा वापर केल्याने कोंडा, बुरशी किंवा खाज येण्याची समस्या दूर होते.

६) ताकामध्ये मुलतानी माती, थोडे खोबरेल तेल आणि लिंबाचा रस मिसळा. त्यामुळे डोके स्वच्छ होण्यासोबतच केस रेशमी बनतील. योगगुरूंनी जेवणाशी संबंधित गोष्टींकडेही लक्ष देण्यास सांगितले.

बाहेरचं खाल्यानंतर छातीत जळजळ होते? ३ उपाय,  एसिडिटी जराही जाणवणार नाही

७) पौष्टिक आहार, हिरव्या भाज्या, फळे खाण्यास सांगितले. त्याच वेळी, त्यांनी अधिक तळलेले आणि मसालेदार पदार्थांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. बाबांनी असेही सांगितले की ज्यांना जास्त राग येतो किंवा चिंतेत राहतात त्यांचेही केसही जास्त पिकतात. अशा स्थितीत योगासनं करून मन शांत करण्याचा प्रयत्न करा. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी