पावसाळ्याच्या दिवसात नेहमीपेक्षा जास्त केस तुटतात. इतकंच नाही तर वातावरणातील बदल मॉईश्चर यामुळे कोंडा आणि कोरडेपणा वाढतो. माथ्यावरच्या केसांची वाढ कमी झाल्यामुळे टक्कल पडेल की काय अशी भिती वाटते. अशा स्थितीत केसांची काळजी घेण्यासाठी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकतात. (Hair Fall Solution) केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी केसांची नियमित काळजी घेणं गरजेचं असतं. (Best Natural Home Remedies to Prevent from Your Hair) हेअर केअर करताना केमिकल्स बेस्ड वस्तूंऐवजी नैसर्गिक पदार्थांचा वापर करा. केस वाढवण्यासाठी काही सोपे- घरगुती उपाय पाहूया. (Hair Care Tips)
केळी आणि पपई
हेअर फॉलची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही केळी आणि पपईचा वापर करू शकता. यासाठी हेअर मास्क बनवा. सगळ्यात आधी पपईच्या स्लाईस करा आणि त्या व्यवस्थित मॅश करून घ्या. यानंतर त्यात अर्ध केळ मॅश करून घाला. हे दोन्ही पदार्थ मिसळून केसांना लावा आणि अर्धा तास केसांवर तसंच राहू द्या नंतर हेअर वॉश करा.
मेथीचे दाणे
केस गळणं थांबवण्यासाठी केस मजबूत ठेवणं फार महत्वाचं असतं. यासाठी २ ते ३ चमचे मेथीचे दाणे पाण्यात मिसळून रात्रभर भिजवण्यसाठी ठेवून द्या. यानंतर मेथीचे दाणे वाटून बारीक पेस्ट बनवा त्यानंतर मेथीच्या पेस्टमध्ये दही आणि एरंडेल तेल मिसळून केसांवर लावा त्यानंतर शॅम्पूने केस धुवा.
शिकेकाई
शिकेकाईचा वापर केस मजबूत बनवण्यासाठी केला जातो. यामुळे केस सिल्की आणि शायनी राहतात. पूर्वापार शिकेकाईचा वापर केसांच्या चांगल्या वाढीसाठी केला जात आहे. २ ते ३ चमचे शिकेकाई पावडर घ्या त्यात १ चमचा दही मिसळून पेस्ट बनवा त्यानंतर केसांना लावून ५ मिनिटं डोक्याची मसाज करा. अर्ध्या तासाने केस स्वच्छ धुवा.
आवळा-लिंबू
केसांच्या चांगल्या वाढीसाठी आवळा आणि लिंबू सुद्धा फायदेशीर ठरतो. यासाठी ३ ते ४ चमचे आवळा पावडर घ्या त्यात थोडं पाणी घालून पेस्ट बनवा. शेवटी २ चमचे लिंबाचा रस घाला नंतर ही पेस्ट केसांना व्यवस्थित लावा आणि अर्ध्या तासानं हेअर वॉश करा.