Lokmat Sakhi >Beauty > केस धुतल्यानंतर जास्तच गळतात? हेअर वॉशची 'ही' पद्धत वापरा, केस होतील दाट, लांबसडक 

केस धुतल्यानंतर जास्तच गळतात? हेअर वॉशची 'ही' पद्धत वापरा, केस होतील दाट, लांबसडक 

Hair Fall Solution : कढीपत्त्यात असलेले अँटीऑक्सिडंट केस मजबूत बनवतात आणि केस गळणे थांबवतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 09:09 AM2023-01-09T09:09:00+5:302023-01-09T09:10:01+5:30

Hair Fall Solution : कढीपत्त्यात असलेले अँटीऑक्सिडंट केस मजबूत बनवतात आणि केस गळणे थांबवतात.

Hair Fall Solution : How to prevent hair fall, easiest way to wash hair | केस धुतल्यानंतर जास्तच गळतात? हेअर वॉशची 'ही' पद्धत वापरा, केस होतील दाट, लांबसडक 

केस धुतल्यानंतर जास्तच गळतात? हेअर वॉशची 'ही' पद्धत वापरा, केस होतील दाट, लांबसडक 

थंडीत केसांमध्ये कोंड्याची समस्या वाढते आणि केस  कोरडे पडतात. केस कोरडे पडल्यानंतर जास्त प्रमाणात गळतात. एकदा केस गळायला लागले की वारंवार तेल, शॅम्पू बदलूनही हवातसा बदल दिसत नाही. केस गळणं थांबवण्यासाठी घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकतात. (How to prevent hair fall, easiest way to wash hair)  हे उपाय केल्यास कमी खर्चात लांब सडक केस मिळण्यास मदत होईल. (Home Remedies for Hair Growth)

साहित्य 

कढीपत्ता - १० ते १५

एलोवेरा जेल - १ चमचा

शॅम्पू - १ चमचा

पाणी  - १ कप

१) हे लिक्विड तयार करण्यासाठी कढीपत्ता पाण्यात भिजवून घ्या. रात्रभर कढीपत्ता पाण्यात भिजवल्यानंतर हे पाणी गाळून घ्या. या पाण्यात १ चमचा मध, माईल्ड शॅम्पू घाला. आणि हे मिश्रण केसांवर घालून केस व्यवस्थित धुवून घ्या. त्यानंतर सुकवा.

२) कढीपत्त्यात असलेले अँटीऑक्सिडंट केस मजबूत बनवतात आणि केस गळणे थांबवतात. याशिवाय, स्कॅल्पमध्ये रक्त परिसंचरण वाढवून, केसांना मुळापासून मजबूत करते. 

३) तुमच्या केसांमध्ये जास्त कोंडा असल्यास त्यावर उपाय करण्यासाठी कढीपत्ता बारीक करून त्यात दही घालून पेस्ट तयार करा. ही पेस्ट संपूर्ण टाळूवर लावा. अर्ध्या तासानंतर केस धुवा.

Web Title: Hair Fall Solution : How to prevent hair fall, easiest way to wash hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.