केसांचे चांगले पोषण व्हावे, त्यांची वाढ नीट व्हावी यासाठी आपण केसांना तेल लावून मसाज करतो. शरीराच्या अवयवांप्रमाणेच केसांचे देखील योग्य पद्धतीने पोषण होणे गरजेचे असते. केसांना तेल लावणं किती अत्यावश्यक आहे हे आपल्याला माहित असत. सुंदर आणि घनदाट केसांसाठी तेलाचा वापर फार पूर्वीपासून केला जातो. केसांना तेलाने मसाज न केल्यास केस कमकुवत होऊन तुटण्याची शक्यता असते. तेलामुळे केसातील कोरडेपणा, कोंडा तसेच केसांशी संबंधित अन्य समस्या कमी होण्यास मदत मिळते(Reasons Why You Are Losing Hair While Oiling).
केसांना तेल लावताना प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने तेल लावणे पसंत करतात. कुणी रात्री केसांना तेल लावत तर कुणी केस धुण्याआधी अर्धा तास केसांना तेल लावून ठेवतात. शक्यतो आपण केसांना तेल लावताना काही चुका करतो. परंतु या रोज होणाऱ्या चुका सुधारुन तेल लावताना काही टिप्स फॉलो केल्या तर त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. आता केसांना तेल लावण्यात काय समजून घेण्यासारखे आहे, असे अनेकांना वाटू शकते. मात्र तेल लावण्याची योग्य पद्धत फॉली केली, तर त्याचा केसांचा पोत सुधारण्यात नक्कीच फायदा होऊ शकतो(Hair fall while oiling).
चुकीच्या पद्धतीने केसांना तेल लावू नका...
हेअर वॉश करण्याआधी किंवा रात्रभर अशा दोन पद्धतींनी आपण केसांना तेल लावून ठेवतो. परंतु या दोन्ही पद्धतींनी केसांना तेल लावल्यास केसांसोबतच स्कॅल्पचे देखील नुकसान होऊ शकते. हेअर वॉश करण्याआधी किंवा रात्रभर केसांना तेल लावण्याआधी काही गोष्टींची खबरदारी घ्यावी. शक्यतो आपल्या स्कॅल्प व केसांमध्ये वातावरणातील धूळ, माती, धूलिकण हे चिकटलेले असतात. अशातच जर आपण केसांना तेल लावले तर स्कॅल्पला चिकटलेली ही घाण या तेलांत मिसळते. यामुळे केस व स्कॅल्पची त्वचा खराब होऊ शकते. स्कॅल्पची त्वचा खराब झाल्याने यावर लहान पुरळ येऊ शकतात. इतकेच नव्हे तर केसांच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यामुळेच, हेअर वॉश करण्याआधी किंवा रात्रभर अशा दोन पद्धतींनी केसांना तेल लावणे योग्य नाही.
पावसांत भिजल्यावर केस खूप ड्राय-रखरखीत होतात? पावसाळ्यात केसांची ‘अशी’ घ्या काळजी...
केसांना तेल लावण्याची योग्य पद्धत कोणती ?
खरंतर, केसांना मजबूत करण्यासाठी आपण स्कॅल्पच्या त्वचेवर तेल लावतो जेणेकरून केसांची मुळे मजबूत होतील. परंतु आपल्या स्कॅपलची त्वचा स्वतः स्वतःचे असे एक प्रकारचे ऑईल तयार करत असते. या नैसर्गिकपणे तयार होणाऱ्या त्वचेतील ऑईलमुळे केसांची मुळे मजबूत होतात. त्यामुळे आपल्या स्कॅल्पमधून नैसर्गिक तेलाची निर्मिती होत असताना जर आपण त्यावर अजून तेल घातले तर ते हानिकारक ठरु शकते. यासाठीच केसांना तेल लावण्याची योग्य पद्धत म्हणजे मुळांना सोडून केसांना वरपासून खालपर्यंत तेल लावणे. कारण मुळांना आधीच नैसर्गिक तेल मिळत असते आणि बाकीच्या केसांना तेल लावून त्यांचे पोषण केले जाते.
आता फक्त ५ सोप्या स्टेप्समध्ये घरच्याघरी करा बॉडी पॉलिशिंग, पार्लरमध्ये जाऊन मिळणार नाही इतका ग्लो!