Lokmat Sakhi >Beauty > केस पांढरे होणं कायमचं होईल बंद, बघा स्वयंपाकघरातल्या २ मसाल्यांची जादू, ‘असा’ करा वापर

केस पांढरे होणं कायमचं होईल बंद, बघा स्वयंपाकघरातल्या २ मसाल्यांची जादू, ‘असा’ करा वापर

Home Remedies For Gray Hair: केस पांढरे हाेऊ नयेत यासाठी स्वयंपाक घरातले २ मसाले खूप उपयोगी ठरतात. ते कोणते आणि कसे वापरायचे ते पाहा. (use of spices in kitchen for gray hair)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2024 04:28 PM2024-04-16T16:28:52+5:302024-04-16T16:38:00+5:30

Home Remedies For Gray Hair: केस पांढरे हाेऊ नयेत यासाठी स्वयंपाक घरातले २ मसाले खूप उपयोगी ठरतात. ते कोणते आणि कसे वापरायचे ते पाहा. (use of spices in kitchen for gray hair)

Hair graying will stop forever, home remedies for gray hair, how to get rid of gray hair, use of spices in kitchen for gray hair | केस पांढरे होणं कायमचं होईल बंद, बघा स्वयंपाकघरातल्या २ मसाल्यांची जादू, ‘असा’ करा वापर

केस पांढरे होणं कायमचं होईल बंद, बघा स्वयंपाकघरातल्या २ मसाल्यांची जादू, ‘असा’ करा वापर

Highlightsदिवसातून एकदा 'हे' पाणी तुमच्या केसांच्या मुळाशी स्प्रे करा. त्यामुळे केस काळे राहण्यास तसेच त्यांची चांगली वाढ होण्यास मदत होते, असं व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. 

केस पांढरे होण्याची समस्या हल्ली खूपच जास्त वाढली आहे. अगदी शाळकरी मुलांचे केसही पांढरे होत आहेत. कॉलेजमध्ये जाणारे बरेच मुलं- मुली असे आहेत की ज्यांना त्यांचे पांढरे केस लपविण्यासाठी हेअर डाय लावावा लागतो किंवा मेहेंदी लावावी लागते. केस पांढरे होण्यामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे आहारातून पुरेसं पोषण न मिळणं. हे पोषण जर केसांना वरतून काही पदार्थांच्या माध्यमातून दिलं तर केस पांढरे होण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं (home remedies for gray hair). त्याचप्रकारचा एक उपाय आता बघा (how to get rid of gray hair). हा उपाय करण्यासाठी स्वयंपाक घरातल्या मसाल्यांचा वापर करण्यात आला आहे. (use of spices in kitchen for gray hair)

 

केस पांढरे होऊ नयेत म्हणून उपाय

केस पांढरे होऊ नयेत म्हणून स्वयंपाक घरातल्या मसाल्याच्या पदार्थांचा कसा वापर करायचा, याविषयीची माहिती देणारा व्हिडिओ aurelabulari या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

संध्याकाळी भूक लागल्याने काहीतरी खावं वाटतं? खा भरपूर प्रोटीन देणारे ७ पदार्थ- वेटलॉससाठीही फायदेशीर

यामध्ये जो उपाय सांगितला आहे तो करण्यासाठी आपल्याला तेजपान, लवंग आणि कॉफी पावडर लागणार आहे.

सगळ्यात आधी ३ ते ४ तेजपान किंवा तेजपत्ता घ्या आणि त्याचे बारीक तुकडे करून ते एका भांड्यात टाका. तेजपान केसांसाठी खूप चांगले कंडिशनर म्हणून काम करते. त्याच्यामध्ये केसांसाठी उपयुक्त ठरणारे इसेंशियल ऑईल, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स चांगल्या प्रमाणात असतात. त्यामुळे केस निरोगी, सिल्की होतात.

 

त्याच भांड्यात आता १ टेबलस्पून लवंग टाका आणि २०० मिली पाणी टाका. हे सगळं मिश्रण आता गॅसवर उकळायला ठेवा. मंद आचेवर ५ ते ७ मिनिटे चांगलं उकळू द्या.

गुलाबाच्या पानांना छिद्रं पडली, फुलंही येईना? कुंडीत टाका 'हा' जादुई पदार्थ- महिनाभरात बहरेल रोप 

यानंतर गॅस बंद करा आणि मिश्रण थोडं थंड झालं की त्यात कॉफी पावडर टाका. सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून एकजीव करून घ्या आणि स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. दिवसातून एकदा हे पाणी तुमच्या केसांच्या मुळाशी स्प्रे करा. लवंग, कॉफी यांच्यातल्या ॲण्टीऑक्सिडंट आणि पोषक घटकांमुळे केसांच्या मुळाशी रक्तप्रवाह वाढतो. त्यामुळे केस काळे राहण्यास तसेच त्यांची चांगली वाढ होण्यास मदत होते, असं व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. 

 

Web Title: Hair graying will stop forever, home remedies for gray hair, how to get rid of gray hair, use of spices in kitchen for gray hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.