Lokmat Sakhi >Beauty > केस कायम गळतात-पातळ झाले? चमचाभर बियांचा खास घरगुती उपाय-केस लांब अन् दाट होतील

केस कायम गळतात-पातळ झाले? चमचाभर बियांचा खास घरगुती उपाय-केस लांब अन् दाट होतील

Hair Growth Booster Recipe By Nutritionist Long Hairs : काळे तिळ केसांसाठी फायदेशीर ठरतात. ज्यामुळे पोषण मिळते.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 11:32 AM2024-09-13T11:32:37+5:302024-09-13T14:24:54+5:30

Hair Growth Booster Recipe By Nutritionist Long Hairs : काळे तिळ केसांसाठी फायदेशीर ठरतात. ज्यामुळे पोषण मिळते.

Hair Growth Booster Recipe By Nutritionist Long Hairs Home Remedies | केस कायम गळतात-पातळ झाले? चमचाभर बियांचा खास घरगुती उपाय-केस लांब अन् दाट होतील

केस कायम गळतात-पातळ झाले? चमचाभर बियांचा खास घरगुती उपाय-केस लांब अन् दाट होतील

केस गळण्याची अनेक कारणं असू शकतात. काहीवेळा केसांची व्यवस्थित काळजी न घेतल्यामुळे केस गळू लागतात. (Hair Care Tips) काही महिला केस व्यवस्थित धूत नाही तर काहीजण केस व्यवस्थित बांधत नाही. केस सतत खेचले गेल्यामुळे स्काल्पवर घाणं जमा व्हायला सुरूवात होते. (How to Grow Hairs Naturally) अशा स्थितीत केस वाढवण्यात अनेकदा अडथळे येतात. शरीरातील पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे केस गळतात. (Hair Fall Homemade Solution)


अशा स्थितीत केसांना लांब-दाट बनवण्यासाठी तुम्ही आहारतज्ज्ञांनी सांगितलेला उपाय करू शकता. न्युट्रिशनिस्ट सिमरन कथुरिया यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून याबाबत अधिक माहिती दिली आहे.  हे तयार करणं खूपच सोपं आहे याचा केसांवर चांगला परिणामही दिसून येतो. ( Hair Growth Booster Recipe By Nutritionist Long Hairs Home Remedies)

पोट लटकतंय, मांड्या जाड दिसतात? रोज सकाळी १ लाडू खा- वजन कमी होईल, सुडौल दिसाल

न्युट्रिशनिस्टच्यामते हे हेअर बुस्टर बनवण्यासाठी भोपळ्याच्या बिया, सुर्यफुलाच्या बिया, काळे तीळ, मधाची आवश्यकता असेल. सगळ्यात आधी एका पॅनमध्ये सुर्यफुलाच्या बिया घालून हलकं भाजून घ्या त्यानंतर भोपळ्याच्या बिया आणि कलौंजी घालून पुन्हा व्यवस्थित भाजून घ्या. नंतर गॅस बंद करून यात मध मिसळा.  हे पोषक तत्वांनी परिपूर्ण असलेलं मिश्रण एका उत्तम हेअर बुस्टरप्रमाणे काम करते. रोज 1 चमचा हे मिश्रण खाल्ल्यास केस लांब, दाट आणि मजबूत होण्यास मदत होईल.


सुर्यफुलाच्या बीया व्हिटामीन ई ने परिपूर्ण असतात. जे एक पॉवरफुल एंटीऑक्सिडेंट आहे. जे  केसांना ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून वाचवते. ज्यामुळे केस कमी प्रमाणात डॅमेज होतात. स्काल्प चांगला राहण्याासाठी तसंच एक्स्ट्रा सिबम प्रोडक्शन टाळण्यासाठी ते फायदेशीर ठरते.

भोपळ्याच्या बियामध्ये व्हिटामीन ए, व्हिटामीन बी, सी आणि मायक्रोन्युट्रिएंट्स जसं की मॅग्नेशियम, फॉस्फरस , आयर्न आणि कॉपर असते. या बियांच्या सेवनाने केस वाढवण्यास आणि रिपेअर होण्यास मदत होते. या बियांमध्ये जिंक मोठ्या प्रमाणात असते. यामुळे केस गळणं थांबतं. केसांचे स्ट्रक्चर सुधारते. केसांचं तुटणं कमी होतं आणि स्काल्पचे आरोग्यही चांगले राहते. 

मी कधीच हॉटेलमध्ये जेवले नाही,' १०० वर्ष जगणाऱ्या लोकांनी सांगितलं डाएट-निरोगी आयुष्य जगाल

काळे तिळ केसांसाठी फायदेशीर ठरतात. ज्यामुळे हेअर फॉलिकल्सना पोषण मिळते. केसांची वाढ चांगली होते.  केस वेळेआधी पांढरे होत नाहीत. याशिवाय केसांना आयर्न, जिंक, सेलेनियम मोठ्या प्रमाणात मिळते.  ज्यामुळे केसांचे आरोग्य चांगले राहते. 

Web Title: Hair Growth Booster Recipe By Nutritionist Long Hairs Home Remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.