Lokmat Sakhi >Beauty > केसांची वाढ खुंटली, काही केल्या केस वाढत नाही? घ्या आल्याचा खास उपाय, केस वाढतील मस्त

केसांची वाढ खुंटली, काही केल्या केस वाढत नाही? घ्या आल्याचा खास उपाय, केस वाढतील मस्त

As a Special Home Remedy use Ginger as a Super hair tonic आले हे केसांसाठी हेअर टॉनिक म्हणून काम करतं, बघा वापरायचे कसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2023 07:12 PM2023-02-13T19:12:23+5:302023-02-13T19:14:13+5:30

As a Special Home Remedy use Ginger as a Super hair tonic आले हे केसांसाठी हेअर टॉनिक म्हणून काम करतं, बघा वापरायचे कसे

Hair growth is stunted, hair does not grow? Take the special remedy of ginger, the hair will grow well | केसांची वाढ खुंटली, काही केल्या केस वाढत नाही? घ्या आल्याचा खास उपाय, केस वाढतील मस्त

केसांची वाढ खुंटली, काही केल्या केस वाढत नाही? घ्या आल्याचा खास उपाय, केस वाढतील मस्त

प्रत्येक गृहिणीला आलं सुपरिचित आहे. आल्यामुळे पदार्थांना उत्तम स्वाद मिळतो. चहामध्ये आले टाकल्यानंतर चहाला देखील कडकपणा येतो. आलं पदार्थाची रुची तर वाढवतेच, यासह त्यातील औषधी गुणधर्म शरीराला पौष्टीक तत्वे देतात. आल्यामध्ये योग्य प्रमाणात विटामिन्स आणि मिनरल्स आढळतात. मॅग्निनशियम, पोटॅशियम आणि फॉसफरस यासारख्या गुणांमुळे केसांना याचा फायदा होतो.

आलं केसांच्या टाळूवर थेट परिणाम करतात. यामुळे केसांची योग्य वाढ होते. केसांना आलं लावल्यामुळे टाळूवरील रक्ताचं सर्कुलेशन वाढण्यास मदत होते. आल्यामध्ये असणारे एण्टीफंगल प्रोपर्टीजमुळे केसातील कोंडा कमी होतो. आपल्याला जर हेअर ग्रोथची समस्या उद्भवत असेल तर, आल्यापासून तयार टॉनिक बनवून पाहा. हा घरगुती उपाय केसांची वाढ तर नक्कीच करेल, यासह नव्या केसांच्या वाढीसाठी देखील मदत करेल.

जिंजर हेअर टॉनिक बनवण्यासाठी लागणारं साहित्य

आल्याचा रस

एरंडेल तेल

एलोवेरा जेल

कृती

केसांच्या ग्रोथसाठी आल्याचा वापर उत्तम ठरेल यासाठी, सर्वप्रथम एका बाऊलमध्ये आल्याचा रस घ्या. आल्याच्या रसात ३ टेबलस्पून एरंडेल तेल मिक्स करा. त्यानंतर ३ टेबलस्पून एलोवेरा जेल टाका. साहित्य टाकल्यानंतर चमच्याने संपूर्ण मिश्रण चांगले मिक्स करा. आता हे मिश्रण केसांच्या मुळापर्यंत लावा. स्काल्पवर हे हेअर टॉनिक लावल्यानंतर हाताने टाळूवर मसाज करा.

मसाज केल्यानंतर थोड्या वेळाने केस सामान्य पाण्याने धुवा. आठवड्यातून दोन वेळा ही प्रक्रिया आपण करू शकता. या हेअर टॉनिकमुळे केसांची वाढीसाठी मदत मिळेल. यासह नवे केस उगवण्यास सुरुवात होईल. 

Web Title: Hair growth is stunted, hair does not grow? Take the special remedy of ginger, the hair will grow well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.