Join us  

चमचाभर मेथीचे दाणे -मूठभर कडीपत्ता! दोनच गोष्टी वापरा, केस होतील घनदाट -चमकदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2023 4:01 PM

Hair Growth: Make Curry Leaves - Fenugreek Seeds hair mask and hair oil, Simple Methods To Use These केस खूप गळत असतील तर हा उपाय करुन पाहा

केसांची योग्य निगा न राखल्यास केसांच्या समस्या वाढतात. व्यस्त जीवनशैलीमुळे केसांची काळजी घेणं कठीण जाते. ज्यात केस गळणे, केसात कोंडा, केस अकाली पांढरे होणे, केसांना फाटे फुटणे अशा समस्या अनेकांना छळतात. ही समस्या सोडवण्यासाठी आहारात बदल व केसांची योग्य काळजी घेणं आवश्यक आहे. केस गळती झाल्यानंतर केस लवकर वाढत नाही. केसांची योग्य वाढ व्हावी यासाठी मेथी दाणे व कडीपत्त्याचा वापर करून पाहा.

मेथीच्या दाण्यांमध्ये लोह आणि प्रथिने भरपूर असतात, कडीपत्त्यात व्हिटॅमिन बी१, बी३, बी९ आणि सी असते. याशिवाय आयर्न, कॅल्शियम आणि फॉस्फोरस आढळतं. ज्यामुळे केसांच्या निगडीत समस्या कमी होतात. व केसांची योग्य वाढ होते. केसांच्या रि - ग्रोथसाठी मेथी व कडीपत्त्याचा वापर करून तेल व हेअर मास्क करा. हे तेल केसांवर लावल्याने केसांच्या अनेक समस्या कमी होण्यास मदत होईल(Hair Growth: Make Curry Leaves - Fenugreek Seeds hair mask and hair oil, Simple Methods To Use These).

माथ्यावरचे केस विरळ झालेत, टक्कल पडेल असे वाटते? ४ उपाय, माथ्यावरचे केस होतील दाट

घरी बनवा मेथी दाणे व कडीपत्त्याचे तेल

केसांच्या वाढीसाठी मेथी दाणे व कडीपत्त्याचे तेल बनवा. यासाठी सर्वप्रथम, कढईत एक कप खोबरेल तेल घालून गरम करण्यासाठी ठेवा. यात ३ चमचे मेथी दाणे, व काही कडीपत्त्याची पाने घालून तेल उकळवत ठेवा. १० मिनिटांसाठी हे तेल गरम करा. त्यानंतर गॅस बंद करा. आता गाळणीतून तेल गाळून घ्या, व एका हवाबंद बॉटलमध्ये भरून ठेवा.

अशा प्रकारे मेथी दाणे व कडीपत्त्याचे तेल वापरण्यासाठी रेडी. आपण या तेलाचा वापर आठवड्यातून २ वेळा करू शकता. हे तेल केस व स्काल्पवर लावून मसाज करा. याने ब्लड सर्क्युलेशन सुरळीत होईल, व केसांची वाढ होते.

त्वचा तेलकट असो किंवा ड्राय, चमचा भर हिरव्या मुग डाळीचा करा खास पॅक, चेहरा चमकेल चटकन

हेअर मास्क बनवण्यासाठी कडीपत्ता व मेथी दाण्याचा करा असा वापर

सर्वप्रथम, मेथी दाण्याची पावडर तयार करा. ही पावडर एका वाटीमध्ये काढून घ्या, त्यात एक चमचा कडीपत्त्याची पेस्ट घालून हेअर मास्क तयार करा. आपल्याला हवं असल्यास त्यात पाणी देखील मिसळू शकता. ही पेस्ट केसांच्या मुळापासून ते केसांच्या टोकापर्यंत लावा. अर्ध्या तासाने केस सामान्य पाण्याने धुवा. याने केसांची ग्रोथ होईल. व शाईन करतील.

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी