हिवाळ्याच्या दिवसांत केसांमध्ये (Winter Hair Care Tips) कोंडा होतो कारण स्काल्प नेहमीपेक्षा जास्त कोरडा झालेला असतो. फक्त महिलांनाच नाही तर पुरूषांनाही हा त्रास उद्भवतो. केसांचं गळणं थांबवण्यासाठी तुम्ही नारळाचं तेल, मोहोरीचं तेल, ऑलिव्ह ऑईल केसांना लावून केस मॉईश्चराईज ठेवू शकता ज्यामुळे केसांना पुरेपूर फायदा मिळेल. ३ प्रकारच्या तेलांनी केसांची मसाज केल्यानं केसांमध्ये ब्लड सर्क्युलेशन चांगले राहते आणि केस मूळापासून मजबूत राहतात. (How to Apply Hair Growth on Hairs Hair Care Tips)
जर तुम्हाला आपले केस लांबसडक, दाट हवे असतील तर सगळ्यात आधी एका मोठ्या वाटीत एक चमचा नारळाचे तेल घाला. त्यात एक मोठा चमचा द्राक्षाच्या बियांचे तेल घाला, त्यात ८ ते १० थेंब इसेंशियल तेल घाला. हे तिन्ही प्रकारचे तेल व्यवस्थित मिसळून घ्या. हे एक पॉवर पॅक हेअर ऑईल आहे. तुम्ही हातांच्या बोटांच्या मदतीनं केसांची मसाज करू शकता. बोटांना सर्क्युलर मोशनमध्ये फिरवून हेअर ऑईल बनवा. हे तेल लावण्यासाठी तुम्ही कापसाच्या बोळ्याचा वापर करू शकता. केसांच्या मुळांची मसाज करा. हे तेल २ तास केसांना लावून ठेवून नंतर माईल्ड शॅम्पूनं केस धुवा.
पोटाचे टायर्स सुटलेत-कंबर लठ्ठ दिसते? २१ दिवस हे पदार्थ खा, वितळेल चरबी-फिट दिसाल
नारळाच्या तेलाचे फायदे
नारळाचे तेल केसांना हेल्दी आणि शायनी ठेवते. यात असे काही गुणधर्म असतात ज्यामुळे केस मुळापासून मजबूत होतात. यात व्हिटामीन ई असते जे केसांच्या मुळांच्या क्युटिकल्समध्ये जाऊन केसांना मजबूत बनवतात. यामुळे ड्रायनेस, डॅमेज आणि कोरडे केस कमी होण्यास मदत होते.
जांभळाच्या बियांचे तेल
जांभळाच्या बियांच्या तेलात व्हिटामीन ई, ओमेगा ३ फॅटी एसिड्स, लिनोलिक एसिड असते. जे केसांसाठी फायदेशीर ठरते. या तेलानं केसांच्या मुळांवर एक कोटींग तयार होते. ज्यामुळे केसांना नैसर्गिक चमक येते आणि केस डॅमेज होण्यापासून वाचतात.
रोजमेरी तेल
रोजमेरी तेल केसांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरते. यामुळे स्काल्पचं ब्लड सर्क्युलेशन चांगले राहते. ज्यामुळे केसांचा विकास चांगला होतो.