Lokmat Sakhi >Beauty > केस काही केल्या वाढतच नाहीत? २ सोपे उपाय, केस वाढतील लांबसडक, होतील मजबूत

केस काही केल्या वाढतच नाहीत? २ सोपे उपाय, केस वाढतील लांबसडक, होतील मजबूत

Hair Growth Remedies hair care Tips : पार्लरच्या महागड्या ट्रिटमेंट घेण्यापेक्षा घरच्या घरी करता येतील असे उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2023 10:12 AM2023-02-20T10:12:39+5:302023-02-20T10:15:02+5:30

Hair Growth Remedies hair care Tips : पार्लरच्या महागड्या ट्रिटमेंट घेण्यापेक्षा घरच्या घरी करता येतील असे उपाय...

Hair Growth Remedies hair care Tips : Hair doesn't grow after doing anything? 2 easy solutions, hair will grow profusely... | केस काही केल्या वाढतच नाहीत? २ सोपे उपाय, केस वाढतील लांबसडक, होतील मजबूत

केस काही केल्या वाढतच नाहीत? २ सोपे उपाय, केस वाढतील लांबसडक, होतील मजबूत

आपले केस लांबसडक आणि मजबूत असावेत असं प्रत्येक मुलीला वाटतं. पण काही वेळा केस खूप गळतात तर काही वेळा केस अजिबात वाढत नाहीत. मग केसांची वाढ अचानक का खुंटली असा प्रश्न आपल्याला पडतो. कधी केसांना पुरेसे पोषण न मिळाल्याने तर कधी आणखी काही कारणांनी केसांची वाढ खुंटते. अशावेळी आपण पार्लरच्या महागड्या ट्रिटमेंट घेतो किंवा काही ना काही उत्पादने लावून केस वाढावेत यासाठी प्रयत्न करतो. पण त्याने केसांची वाढ सुधारतेच असे नाही (Hair Growth Remedies hair care Tips). 

म्हणूनच आज आपण २ सोपे उपाय पाहणार आहोत ज्यामुळे केसांची वाढ होण्यास निश्चितच मदत होईल. केस वाढण्यासाठी त्यांना योग्य प्रमाणात प्रोटीन, व्हिटॅमिन, लोह झिंक यांसारखे पोषण घटक मिळणे गरजेचे असते. कोरफडीचा गर असंख्य गुणांनी युक्त असल्याने केसांच्या वाढीसाठी तो अतिशय उपयुक्त असतो. तुमच्या केसांची योग्य पद्धतीने वाढ होत नसेल तर कोरफडीच्या गराचा चांगला फायदा होतो. कोरफडीचा नेमका कसा उपयोग करायचा ते पाहूया..

(Image : Google)
(Image : Google)

१. कोरफड आणि कांद्याचा वापर

कोरफडीचा गर काढा, एका कांद्याचा मिक्सरमधून रस काढा. हे दोन्ही एका बाऊलमध्ये एकत्र करा. हे मिश्रण केसांना मुळांपासून टोकांपर्यंत लावा. यामुळे केसांची कमी झालेली वाढ होण्यास मदत होईल. कांद्याचा रस केसांसाठी अतिशय फायदेशीर असतो आणि तो घरात सहज उपलब्ध असल्याने हा उपाय करणे सोपे असते. 

(Image : Google)
(Image : Google)

२. कोरफड आणि नारळाचे दूध 

नारळाच्या दुधात खूप पोषण असते, म्हणून आपण आहारातही या दुधाचा समावेश करतो. त्याचप्रमाणे केसांना पोषण मिळण्यासाठीही नारळाचे दूध फायदेशीर ठरते. एका बाऊलमध्ये नारळाचे दूध आणि कोरफडीचा गर एकत्र करा. हे मिश्रण केसांना लावून ठेवा आणि साधारण १ तासाने केस हलक्या शाम्पू आणि कंडीशनरने धुवा. या दोन्ही घटकांमुळे केसांना चांगले पोषण मिळेल आणि केस मजबूत होण्यासही मदत होईल. 


 

Web Title: Hair Growth Remedies hair care Tips : Hair doesn't grow after doing anything? 2 easy solutions, hair will grow profusely...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.