Join us

मोस्टलीसेन प्राजक्ता कोळीच्या सुंदर केसांचं सिक्रेट, तिच्या वडिलांनी तयार केलं ‘असं’ खास तेल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2025 15:04 IST

Hair Growth Secrets By Prajakta koli : Prajakta Koli swears by this DIY hair oil made by her dad, calls it ‘magic’ for hair fall and damage Here's the recipe : Prajakta Koli's secret to healthy hair homemade onion curry leaf oil : प्राजक्ता करते, वडिलांनी तयार केलेल्या घरगुती तेलाची मस्त चंपी - पाहा तिचे हेअर केअर रुटीन...

'मोस्ट्लीसेन' म्हणून ओळखली जाणारी सुप्रसिद्ध युट्युबर प्राजक्ता कोळी आपली त्वचा आणि केसांची विशेष काळजी घेते. अभिनयासोबतच तिचे अनेक चाहते तिच्या सौंदर्याचे आणि लुक्सचे जबरदस्त फॅन्स आहेत. प्राजक्ता आपले सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी फारसे महागडे उपचार किंवा पार्लरला जात नाही. तिच्या स्किन आणि हेअर केअर ( Prajakta Koli's secret to healthy hair homemade onion curry leaf oil) रुटीनमध्ये ती नेहमीच घरगुती उपायांना (Hair Growth Secrets By Prajakta koli) अधिक प्राधान्य देते. आत्तापर्यंत तिने अनेक मुलाखतींमध्ये तिच्या हेल्दी स्किन आणि केसांचे सिक्रेट शेअर केले आहे.

केसांची योग्य ती काळजी घेण्यासाठी ती पार्लर किंवा महागडे हेअर केअर प्रॉडक्ट्स असं काहीच न वापरता, चक्क तिच्या वडिलांनी पारंपरिक पद्धतीने तयार केलेले घरगुती तेल वापरते. शूटिंग दरम्यान केसांची वेगवेगळी हेअर स्टाईल केल्यामुळे केस खराब होतात. अशावेळी ती वडिलांनी तयार केलेल्या घरगुती तेलाची मस्त चंपी करते. तिच्या वडिलांनी तयार केलेलं घरगुती तेल हेच तिचे खास हेअर केअर रुटीन असल्याचे ती सांगते. प्राजक्ताच्या वडिलांनी तयार केलेलं हे घरगुती तेल आपण अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरीच तयार करू शकतो. या सिक्रेट तेलाची रेसिपी पाहूयात. 

साहित्य :- 

१. कांदा - १ कप २. कडीपत्ता - १ कप ३. खोबरेल तेल - १ कप 

कतरिना केसांना लावते तिच्या सासूबाईंनी तयार केलेलं खास तेल, पाहा या घरगुती तेलाची सिक्रेट रेसिपी...

सतत हेअर स्टाईल करुन खराब झालेल्या केसांसाठी माधुरी दीक्षितचा 'देसी उपाय' - केस होतील मऊमुलायम...

कृती :- 

१. सगळ्यांत आधी एका मोठ्या कढईत खोबरेल तेल घेऊन ते व्यवस्थित गरम करून घ्यावे. २. तेल व्यवस्थित गरम झाल्यावर या तेलात उभा चिरलेला कांदा घालून तो रंग बदलून खरपूस होईपर्यंत तळून घ्यावा. ३. कांद्याचा रंग बदलू लागला की कांदा चमच्याने काढून घ्यावा. मग त्याच तेलात कडीपत्त्याची पानं घालावीत. 

फक्त शाम्पूने धुवून स्काल्प स्वच्छ होत नाही, वापरा 'हा' आयुर्वेदिक लेप - केस होतील चांगले...

४. कडीपत्त्याची पानं २ मिनिटे त्यात तळून घ्यावीत. मग ही पान देखील चमच्याने बाहेर काढून घ्यावी. ५. सगळ्यात शेवटी हे तेल गाळणीने गाळून घ्यावे. ६. गाळून घेतलेले तेल एका काचेच्या बाटलीत भरून स्टोअर करावे. 

अशाप्रकारे हे घरगुती तेल आपण केसांसाठी वापरु शकतो. या तेलाच्या वापराने केसगळती सारख्या केसांच्या इतर समस्या कमी होण्यास मदत होईल.

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी