Join us  

केस धुताना खूप गळतात-पातळ झाले? १० रूपयांत करा 'हा' सोपा उपाय, दाट केसांचा फॉर्म्यूला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2024 3:37 PM

Hair Growth Shampoo : केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी तुम्ही कढीपत्ता, मेथीचे दाणे, तांदूळ या २ ते ३ घटकांचा वापर करू शकता. केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी हा उत्तम उपाय ठरेल.

केस विंचरताना, केस धुताना खूप गळतात अशी तक्रार प्रत्येकाचीच असते. (Hair Growth Tips) केस गळणं कमी करण्यासाठी लोक बरेच शॅम्पू, तेलांचा वापर करतात. केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी तुम्ही फॅन्सी उत्पादनांवर फार खर्च न करता घरच्याघरी काही सोपे उपाय करून लांबसडक, दाट केस मिळवू शकता. (How to Regrow Hairs Naturally With Natural Remedies) केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी तुम्ही कढीपत्ता, मेथीचे दाणे, तांदूळ  या २ ते ३ घटकांचा वापर करू शकता. केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी हा उत्तम उपाय ठरेल. (How to Grow Hairs Faster)

केसांच्या वाढीसाठी घरगुती  उपाय (How to Grow Hairs Naturally)

1) केसांचे गळणं कमी करण्यासाठी सगळ्यात आधी ताज्या कढीपत्त्याची पानं एका वाटीत काढून  घ्या.  त्यात चमचाभर तांदूळ घालाा, १ चमचा मेथी घाला, १ चमचा आळशीच्या बिया घाला, यात अर्धा ग्लास पाणी घालून रात्रभरासाठी हे मिश्रण भिजवून ठेवा.

2) सकाळी या पाण्यात तुम्ही वापरत असलेला शॅम्पू मिसळून या पाण्याने केस धुवा. नेहमीप्रमाणे आधी केस ओले करा. त्यानंतर त्या सौम्य शॅम्पू घालून केस व्यवस्थित धुवून घ्या. 

शिस्त लावणाऱ्या प्रेमळ आईचे ८ गुण; न ओरडता मुलांना शिस्त लागेल, होतील चांगले संस्कार

3) केस चांगले राहण्यासाठी या शॅम्पूने आठवड्यातून एकदा केस धुवा. ज्यामुळे केसांना शाईन येईल आणि केस चमकदारही दिसतील.

घरगुती शॅम्पू वापरण्याचे फायदे (Benefits Of Homemade Shampoo)

जेव्हा तुम्ही केसांना बाजारातील शॅम्पू लावतात तेव्हा केसांना कंडिशनरचा वापर करावा लागतो. पण घरगुती शॅम्पूच्या बाबतीत असं होत  नाही. हर्बल शॅम्पू प्राकृति कंडिशनिंगचे काम करतो. ज्यामुळे केस मऊ आणि मुलायम होतात. हर्बल शॅम्पूमध्ये आवळा आणि शिकेकाई, कढीपत्त्याचा वापर करा. यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगले राहते आणि नवीन केस उगवण्यास मदत होते.  (पोट कमी करायचंय-डाएट शक्य नाही? रोजचं जेवण 'या' पद्धतीनं खा, महिन्याभरात चरबी होईल कमी)

शिकेकाईमध्ये एंटी बॅक्टेरिअल आणि एंटी फंगल गुण असतात. ज्यामुळे कोंडा कमी होण्यास मदत होते. उन्हाळ्याच्या दिवसांत स्काल्प ड्राय होतो. अशावेळी हा शॅम्पू फायदेशीर ठरतो. १०० टक्के नैसर्गिक पदार्थांचा वापर केल्यामुळे केसांची चमक वाढण्यास मदत होते  आणि केस दाट होतात.

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स