Lokmat Sakhi >Beauty > फक्त ५ रुपयांच्या कढीपत्त्याने घनदाट-लांब होतील केस; 'या' पद्धतीने केसांना लावा-केस गळणंही थांबेल

फक्त ५ रुपयांच्या कढीपत्त्याने घनदाट-लांब होतील केस; 'या' पद्धतीने केसांना लावा-केस गळणंही थांबेल

Hair Growth Tips Curry Leaves Benefits For Hair (kes galtivar upay) : केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही घरच्याघरी  रोजच्या वापरात असलेल्या कढीपत्त्याचा वापर करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 11:48 AM2023-12-06T11:48:48+5:302023-12-06T15:07:23+5:30

Hair Growth Tips Curry Leaves Benefits For Hair (kes galtivar upay) : केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही घरच्याघरी  रोजच्या वापरात असलेल्या कढीपत्त्याचा वापर करू शकता.

Hair Growth Tips Curry Leaves Benefits For Hair : How to use Curry Leves For Hair Growth | फक्त ५ रुपयांच्या कढीपत्त्याने घनदाट-लांब होतील केस; 'या' पद्धतीने केसांना लावा-केस गळणंही थांबेल

फक्त ५ रुपयांच्या कढीपत्त्याने घनदाट-लांब होतील केस; 'या' पद्धतीने केसांना लावा-केस गळणंही थांबेल

दाट, बाऊंसी केस प्रत्येकालाच आवडतात. (Hair Care Tips) प्रदूषण, खाणंपिणं व्यवस्थित नसणं, सतत केमिकल्सचा वापर  करणं यामुळे केस मोठ्या प्रमाणात गळतात. केस गळणं (Hair Fall)  थांबवण्यासाठी बाजारात अनेक शॅम्पू तेल उपलब्ध आहेत. पण यातील केमिकल्समुळे केसांचे नुकसान होऊ शकते. केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही घरच्याघरी  रोजच्या वापरात असलेल्या कढीपत्त्याचा वापर करू शकता. (How to use Curry Leaves For Hair Growth)

कढीपत्त्यात अनेक औषधी गुणधर्म असतात. कढीपत्ता खाल्ल्याने इन्फेक्शनपासून बचाव होतो तर इम्यूनिटी वाढण्यासही मदत होते अनेकजण पदार्थांतून कढीपत्ता बाजूला काढून ठेवतात. असं न करता रोज न चुकता कढीपत्ता खायला हवा. कढीपत्ता आरोग्याप्रमाणेच केसांसाठीही तितकाच फायदेशीर ठरतो. (Curry Leaves Benefits For Hair)

मेथीचे दाणे,  मोहोरी आणि कढीपत्त्याचा वापर करू तुम्ही केसांची व्यवस्थित काळजी घेऊ शकता.  कारण मेथीचे दाणे केसांच्या वाढीस मदत करतात. यामुळे पातळ केसांना वॉल्यूमिनस लूक येतो. याव्यतिरिक्त हेअर ग्रोथसाठीही मेथीचे दाणे फायदेशीर ठरतात. केसांना दाट बनवण्यापासून पोषण देण्यापर्यंत या तेलाचे अनेक फायदे आहेत. यातील पोषक तत्व केसांना हेल्दी ठेवण्याचे काम करतात.

समोरचे केस जास्तच पांढरे झालेत? कांद्याची साल 'या' पद्धतीनं लावा, काळेभोर-दाट होतील केस

केसांना शायनी बनवण्यासाठी काय करावे?

पातळ केसांना दाट बनवण्यासाठी सगळ्यात आधी मेथीचे दाणे उकळून एका बाऊलमध्ये घाला. यात थोडे कढीपत्ते घालून व्यवस्थित दळून घ्या. यात २ ते ३ चमचे मोहोरीचे तेल मिसळा. हे सर्व पदार्थ एकजीव करून व्यवस्थित शिजू द्या. हे तेल थंड झाल्यानंतर गॅस बंद करा. जवळपास २ तास हे तेल केसांना लावलेले राहू द्या. त्यानंतर शॅम्पू किंवा कंडिशनरच्या मदतीने केस स्वच्छ धुवा.

रोज रोज गळून केस शेपटीसारखे झाले? हे खास घरगुती तेल लावा-१०० % वाढतील केस-दाट होतील

हा उपाय केल्याने काही दिवसांतच फरक दिसून येईल आणि केसांची वाढ होईल. कढीपत्त्यातील गुणकारी तत्व केसांच्या वाढीस प्रोत्साहन देतात. याशिवाय केस पांढरे होणंही रोखता येतं. केसांच्या चांगल्या वाढीसाठी कढीपत्त्याची पानं बारीक करून हा मास्क केसांना लावा. यामुळे केस लांबसडक होतील.

Web Title: Hair Growth Tips Curry Leaves Benefits For Hair : How to use Curry Leves For Hair Growth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.