Join us  

रोज रोज गळण्यामुळे केस विरळ झालेत? १ कांदा अन् चमचाभर दह्यानं केस होतील लांब-दाट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 1:27 PM

Hair Growth Tips : दह्याचा वापर करून तुम्ही हेअर पॅक बनवू शकता. हेअर स्पा साठीही याचा वापर केला जातो. (How to loss grow hair)

केसांच्या समस्यांवर  विकतचे केमिकल्सयुक्त उत्पादनं वापरण्याऐवजी नैसर्गिक घटकांचा वापर केला तर साईड इफेक्ट्स कमी होतात. (Hair Care Tips) सर्वांच्याच फ्रिजमध्ये दही असतं काहीजण पावसाळ्यात दही खाणं टाळतात पण दह्याचा वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वापर केला जातो. दही त्वचा आणि केसांसाठीही तितकंच गुणकारी आहे. दह्याचा वापर करून तुम्ही हेअर पॅक बनवू शकता. हेअर स्पा साठीही याचा वापर केला जातो. (How to grow hair faster)

दह्याचा हेअर पॅक कसा बनवायचा? (How to grow hair naturally using curd)

सगळ्यात आधी एका भांड्यात वाटीभर दही घ्या. त्यात कांद्याचा रस घाला. एलोवेरा जेल मिसळा, राईचं तेल मिसळा. हे चारही पदार्थ व्यवस्थित एकत्र करा. केसांच्या मुळांना आणि लांबीला लावून हलक्या हातानं मसाज करा. मग केस बांधून ठेवा. जमल्यास केसांना स्टिम द्या. १ तासानंतर केस स्वच्छ धुवून घ्या.  एक महिना हा उपाय केल्यानंतर तुम्हाला फरक जाणवलेला दिसेल. 

केसांना दही लावण्याचे फायदे

१) केस निरोगी राहण्यासाठी स्काल्प निरोगी ठेवणं गरजेचं असतं. केसांना दही लावल्यानं कोंडा होण्याची समस्या नियंत्रणात राहते. याचा केसांच्या ओव्हर ऑल आरोग्यावर सकारात्मक परीणाम होतो. 

२) दही केसांना मऊ, मॉईश्चराईज ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते.  अभ्यासानुसार दही केस गळणं कमी करण्यासाठी एक नैसर्गिक उपायांच्या स्वरूपात वापरले जाते. यात एंटी इंफ्लेमेटरी गुण असतात त्यामुळे कोंडा कमी होण्यास मदत होते.

३) केसांच्या वाढीसाठीही दही फायदेशीर आहे. दह्यामध्ये बायोटेक आणि झिंक घटक आढळतात, ज्यामुळे केस गळणे थांबते. 

४) जर तुमचे केस खूपच कोरडे दिसत असतील  तर दही लावल्यानं केस नैसर्गिकरित्या मऊ होतील. केसांना नवी चमक मिळेल.

५) दही त्वचा आणि केसांमधील संक्रमण आणि बॅक्टेरीयांना रोखते. यातील बायोटीन आणि जिंक गळणारे केस कमी करतात. दही केसांच्या विकासासाठी एका बुस्टरप्रमाणे काम करते. 

६) स्काल्प इन्फेक्शन झाल्यास दह्यातील लॅक्टीक एसिड स्काल्प स्वच्छ करण्यास फायदेशीर ठरते. यामुळे मृत त्वचेच्या पेशी एक्सफोलिएट होतात आणि स्काल्प इन्फेक्शनपासून बचाव होतो.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीकेसांची काळजी