केस वाढवण्यासाठी अनेकदा हेअर मास्क वापरण्याा सल्ला दिला जातो. हेअर मास्क लावण्याऐवजी तुम्ही काही प्रकारच्या पानांचा आहारात समावेश करूनही केस वाढवू शकता. शेवग्याच्या शेंगा भाजी किंवा सांबरमध्ये आवडीने खाल्ल्या जातात. यात मोठ्या प्रमाणात व्हिटामीन्स असतातत. (Moringa leaves for hair fall)
शेवग्याच्या पानांचाही तब्येतीला बराच फायदा होतो. (Hair Care Tips) फक्त आरोग्यासाठीच नाही तर केसांसाठीही ही पानं फायदेशीर ठरतात. महिन्याभरात अगदी व्यवस्थित पद्धतीने तुम्ही या पानांचा वापर केला तर तुम्ही पुरेपूर रिजल्ट मिळवू शकतात. (How to use moringa leaves on hair)
शेवग्याच्या शेंगात व्हिटॅमिन ए असते, जे निरोगी त्वचेला प्रोत्साहन देण्यासाठी ओळखले जाते. वनस्पतीमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि अँटीफंगल गुणधर्म देखील आहेत ज्यामुळे मुरुम आणि त्वचेच्या इतर समस्या टाळता येतात. मॉइश्चरायझिंग आणि अँटी-एजिंग गुणधर्मांमुळे मोरिंगा तेल बहुतेकदा त्वचेच्या काळजी उत्पादनांमध्ये वापरले जाते.
मोरींगा पावडरची पेस्ट कशी बनवावी?
मोरींगा पावडर तुम्हाला बाजारात सहज उपलब्ध होईल. सगळ्यात आधी एका वाटीत मोरींगाची पावडर काढून घ्या. त्यात मेहेंदी पावडर, आवळा पावडर, भृंगराज पावडर आणि दही घालून एक पेस्ट बनवा. ही पेस्ट केसांना लावून अर्धा तास तसेच ठेवा नंतर स्वच्छ पाण्याने केस धुवा. यामुळे केस दाट आणि शायनी दिसतील.
1) शेवग्याची पानं आयर्नचा चांगला स्त्रोत आहेत. यात व्हिटामीन ए, बी, सी आणि बायोटीन असते. यात एमिनो एसिड्सही असतात.
2) ज्यामुळे हेअर फॉलिकल्स चांगले राहतात आणि कोलोजनचचे उत्पादन होते. कोलोजन त्वचा आणि केस दोन्हींना चमकवण्याचे काम करते. ही पानं वाटून याचा लेप केसांना लावल्यास ब्लड सर्क्युलेशन चांगले होते.
विकतसारखं जाळीदार, मऊ अप्पम घरीच करा; 7 सोप्या ट्रिक्स-केरळस्टाईल परफेक्ट अप्पम बनेल
3) जर तुम्हाला शेवग्याच्या पानांचा मास्क बनवायला वेळ नसेल तर तुम्ही याची पानं चावू शकता. शेवग्याची पानं खाल्ल्याने केसांची चांगली वाढ होते.
4) याशिवाय त्वचा चमकदार आणि डागविरहीत दिसते. ज्यांना हेअरफॉलचा त्रास उद्भवतो त्यांनी आवर्जून ही पानं खायला हवीत.
झोपताना केस बांधून ठेवता? अंथरूणात पडताना ५ गोष्टी टाळा,अन्यथा केस गळतील-टक्कलही पडेल
5) रात्री झोपण्याआधी या पानांचे सेवन करावे. शेवग्याच्या पानांतून कॅरेटिनचेही उत्पादन वाढते. जे केसांच्या वाढीसाठी उत्तम मानले जाते.
6)शेवग्याच्या पानांची पेस्ट बनवून घ्या. यात इसेंशियल ऑईलमध्ये मिसळा. त्यानंतर हे केल केसांना लावा. यामुळे केस मऊ-मुलायम होतील. याशिवाय केस दाटही दिसतील.