Join us  

कंगवा फिरवताच खूप केस गळतात? लांबसडक, दाट केसांसाठी जावेद हबीबच्या खास टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 5:25 PM

Hair Growth Tips Jaweb Habib : केस तज्ज्ञ जावेद हबीब सांगतात की, तुम्ही कोणत्याही रसायनांशिवाय घरच्या घरी केसांची वाढवू शकता.

आपले केस लांब, काळेभोर असावेत असं प्रत्येकालाच वाटतं. (Hair Growth Tips) पण प्रदुषण, वातावरणातील बदल,  व्यवस्थित खाणं पिणं नसणं यामुळे केसांचं गळणं वाढत जातं. (Hair Care Tips) अशा स्थितीत घरगुती पद्धती वापरणे अधिक योग्य आहे.  प्रसिद्ध केस तज्ज्ञांनी केस लांब बनवण्याचे रहस्य शेअर केले आहे. (How Grow Hairs Fast by expert jawed habib)

हेअर ग्रोथ ट्रिटमेंट सिक्रेट

जावेद हबीब यांनी सांगितलेली हेअर ग्रोथ ट्रिटमेंट आठवड्यातून एकदा केसांच्या केल्यावरही तुमचे केस लवकर वाढतील आणि घट्ट होतील. हे उपचार करणे खूप सोपे आहे आणि त्यासाठी तुम्हाला फक्त 15 मिनिटे आणि आठवड्यातून फक्त एक दिवस आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊया केस तज्ज्ञ जावेद हबीब यांचे केस जलद वाढण्याचे घरगुती रहस्य.

केस तज्ज्ञ जावेद हबीब सांगतात की, तुम्ही कोणत्याही रसायनांशिवाय घरच्या घरी केसांची वाढ वाढवू शकता. यासाठी तुम्हाला फक्त कांदा आणि आले पाहिजे. या दोन्ही गोष्टींचा अर्क केसांसाठी खूप उपयुक्त आहे. त्याचा वापर केल्याने केसांची वाढ झपाट्याने होऊ लागते. हे हेअर सिक्रेट ट्राय करण्यासाठी कांदा आणि आल्याचा रस काढा आणि दोन्ही मिक्स करा. या मिश्रणात 50 टक्के कांद्याचा रस आणि 50 टक्के आल्याचा रस असावा. लक्षात ठेवा की हा कांदा आणि आल्याचा रस ताजा असावा. याचा केसांवर लवकर परिणाम होईल आणि केस लवकर वाढतील.

कांदा आणि आल्याचे हे द्रव केसांच्या मुळांना लावले जाते. कारण केसांच्या वाढीसाठी मुळांना योग्य पोषण आवश्यक असते आणि टाळूला संसर्गमुक्त ठेवण्याची गरज असते. हे मिश्रण केसांना फक्त 10 मिनिटांसाठी लावा त्यानंतर शॅम्पू  लावा. कोणताही उपचार योग्य प्रकारे करणे खूप महत्वाचे आहे. 

हेअरएक्सपर्ट जावेद हबीब यांच्यामते आठवड्यातून फक्त 15 मिनिटे केसांच्या वाढीची ही ट्रीटमेंट केल्यास केसांच्या वाढीतील फरक काही दिवसातच दिसून येईल. अशा उपायांमध्ये संयम बाळगणे फार महत्वाचे आहे. कारण केसांची वाढ प्रत्येक व्यक्तीच्या शरीरावर आणि आरोग्यावर अवलंबून असते. काहींमध्ये थोड्याच वेळात परिणाम दिसायला लागतो तर काहींमध्ये उशीरा दिसून येतो. पण या दरम्यान उपाय थांबवू नये. फरक दिसून येईल आणि तुमचे केसही वाढू लागतील.

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी