Lokmat Sakhi >Beauty > Hair Growth Tips : कंगवा फिरवताच खूप केस तुटतात? दाट, मजबूत केसांसाठी १ उपाय, केसांचं गळणं होईल बंद

Hair Growth Tips : कंगवा फिरवताच खूप केस तुटतात? दाट, मजबूत केसांसाठी १ उपाय, केसांचं गळणं होईल बंद

Hair Growth Tips: केसाचं गळणं थांबत नाहीये, खूप केस तुटतात? दाट केसांसाठी संत्र्यांचा असा वापर करा, केसांचं गळणं होईल बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 01:22 PM2022-04-05T13:22:43+5:302022-04-05T13:38:34+5:30

Hair Growth Tips: केसाचं गळणं थांबत नाहीये, खूप केस तुटतात? दाट केसांसाठी संत्र्यांचा असा वापर करा, केसांचं गळणं होईल बंद

Hair Growth Tips : Orange for hair benefits aids dandruff problems also growth | Hair Growth Tips : कंगवा फिरवताच खूप केस तुटतात? दाट, मजबूत केसांसाठी १ उपाय, केसांचं गळणं होईल बंद

Hair Growth Tips : कंगवा फिरवताच खूप केस तुटतात? दाट, मजबूत केसांसाठी १ उपाय, केसांचं गळणं होईल बंद

आजकाल केस गळणं आणि केस पांढरे होणं या दोन समस्या सगळ्याच वयोगटातील मुलामुलींमध्ये उद्भवतात. अनियमित जीवनशैली, केसांना तेल लावण्याचा कंटाळा, खाण्यापिण्यात अन्हेल्दी पदार्थांचा समावेश यामुळे नकळतपणे ही समस्या वाढत जाते. (Hair Care Tips) केसांचं गळणं थांबवण्यासाठी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकतात. (How to get long and thick hairs naturally)

संत्री हे फळ फक्त खाण्यासाठी चविष्ट नसून ते त्वचा आणि केसांसाठीही वापरले जाते. तुम्ही विचार करत असाल केसांसाठी संत्री कशी वापरली जातात?  तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (Orange for hair benefits aids dandruff problems also growth) केसांवर संत्री कशी आणि किती उपयुक्त ठरतात.

संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट असतात हे सर्वांनाच माहीत आहे. जर तुम्हाला तुमच्या शरीरात व्हिटॅमिन-सी हवा असेल तर लगेचच रोज २-३ संत्री खायला लागा. (Orange for hair growth) संत्र्यामध्ये व्हिटॅमिन-सी मुबलक प्रमाणात असते, जे केसांच्या स्कॅल्पचे पीएच वाढवण्यास आणि इन्फेक्शन दूर करण्यास मदत करते.

संत्र्याचा हेअरमास्क

तुम्ही ऑरेंज हेअर मास्क देखील वापरू शकता. हा हेअर मास्क केसांना पोषण देण्यासाठी उपयुक्त आहे. हा मास्क तुमचे केस मऊ आणि चमकदार बनवेल.

ऑरेंज हेअर कंडिशनर

 केसांच्या कंडिशनरनेही केस मजबूत करता येतात. जर तुमचे केस खूप कोरडे आणि निर्जीव असतील तर केसांना कंडिशनिंग करण्यासाठी तुम्ही ऑरेंज कंडिशनर वापरावे.

कोंड्याची समस्या होईल दूर

कोंड्याची समस्या संत्र्याने संपते आणि त्यासोबतच केसांची वाढही होते. म्हणजेच केसांमध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारे संत्री वापरू शकता. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

१) संत्री आणि मध

हा हेअर मास्क बनवण्यासाठी आधी संत्र्याचा रस काढून त्यात मध टाकून मिश्रण तयार करा. आता ते मुळांपासून संपूर्ण केसांना चांगले लावा. सुमारे 10 मिनिटांनंतर केस साध्या पाण्याने चांगले धुवा. शॅम्पूनंतर तुम्हाला हा हेअर मास्क वापरावा लागेल कारण तो कंडिशनरप्रमाणे काम करेल. जे तुमचे खराब झालेले केस मऊ बनवते तसेच त्यांना डीप कंडिशनिंग करते.

२) संत्री आणि अॅपल

हा हेअर मास्क बनवण्यासाठी दोन संत्री आणि १ सफरचंद सोलून दोन्ही मिक्सरमध्ये टाका आणि प्युरी तयार करा. तयार केलेली प्युरी केसांच्या मुळापासून शेवटपर्यंत चांगली लावा. हा हेअर मास्क केसांवर अर्धा तास तसाच राहू द्या. यानंतर, थोडासा शॅम्पू लावा आणि थंड पाण्याने केस चांगले धुवा. यामुळे केसांची वाढ आणि स्कॅल्पमध्ये रक्त परिसंचरण सुधारते.

३) संत्री आणि ऑलिव्ह ऑईल

केसांमध्ये कोंडा होण्याच्या समस्येमुळे केस खूप गळू लागतात. मुख्यतः हिवाळ्यात कोंडयाचा त्रास अनेकांना होतो. अशावेळी संत्र्याच्या रसाने या समस्येपासून सुटका मिळू शकते. यासाठी ऑलिव्ह ऑइलमध्ये संत्र्याचा रस घालून हे मिश्रण केसांना चांगले लावावे.

साधारण 20-25 मिनिटांनंतर केस सौम्य शाम्पूने चांगले धुवा. आठवड्यातून दोनदा याचा वापर करून तुम्ही सकारात्मक परिणाम मिळवू शकता. याशिवाय संत्र्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स सुद्धा कोंडामुळे होणाऱ्या खाज सुटण्यापासून आराम देतात.
 

Web Title: Hair Growth Tips : Orange for hair benefits aids dandruff problems also growth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.