Lokmat Sakhi >Beauty > रोज तुटून केस विरळ झालेत? १ कांदा अन् ४ कडूलिंबाची पानं घ्या; ३० दिवसांत केसांची वाढ होईल

रोज तुटून केस विरळ झालेत? १ कांदा अन् ४ कडूलिंबाची पानं घ्या; ३० दिवसांत केसांची वाढ होईल

Hair Growth tips : सगळ्यात आधी कडूलिंबाची पानं स्वच्छ धुवून पाण्यात भिजवून घ्या.  हे पाणी उकळवून घ्या आणि उकळ्यानंतर कडूलिंबाच्या पानांचं पाणी गाळून घ्या.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2023 11:44 PM2023-05-28T23:44:30+5:302023-05-28T23:48:19+5:30

Hair Growth tips : सगळ्यात आधी कडूलिंबाची पानं स्वच्छ धुवून पाण्यात भिजवून घ्या.  हे पाणी उकळवून घ्या आणि उकळ्यानंतर कडूलिंबाच्या पानांचं पाणी गाळून घ्या.

Hair Growth tips : Powerful homemade hair syrum How to grow hair using onion | रोज तुटून केस विरळ झालेत? १ कांदा अन् ४ कडूलिंबाची पानं घ्या; ३० दिवसांत केसांची वाढ होईल

रोज तुटून केस विरळ झालेत? १ कांदा अन् ४ कडूलिंबाची पानं घ्या; ३० दिवसांत केसांची वाढ होईल

केस पातळ, कोरडे होण्याची समस्या अनेकांना उद्भवते.  एकदा केस गळायला लागले की शॅम्पू तेल बदलूनही फारसा उपयोग होत नाही. केस गळतीवर काही घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकतात. (Hair Growth tips) याचे कोणतेही साईट इफेक्टसही जाणवत नाही आणि केसांची वाढही चांगली होते. कांदा प्रत्येकाच्याच स्वयंपाकघरात असतो. कांद्याशिवाय पदार्थाला चव येत नाही. त्याचप्रमाणे केसांच्या वाढीसाठीही कांदा महत्वाचा मानला जातो (How to grow hair using onion)

सगळ्यात आधी कडूलिंबाची पानं स्वच्छ धुवून पाण्यात भिजवून घ्या.  हे पाणी उकळवून घ्या आणि उकळ्यानंतर कडूलिंबाच्या पानांचं पाणी गाळून घ्या. १ कांदा बारीक चिरून त्याची पेस्ट तयार करा. कांद्याच्या  पेस्टमधून कांद्याचं पाणी बाजूला काढा. हे  पाणी कडुलिंबाच्या पाण्यात मिसळा आणि या पाण्यानं केसांवर मसाज करा. यामुळे केसांवर चांगला परीणाम दिसून येईल.

1) जर तुम्हाला लांब केस वाढवायचे असतील तर केसांवर मेथी, आवळा आणि कडुलिंबाच्या पानांची पेस्ट वापरा. या सर्व गोष्टी ताज्या घ्या आणि पेस्ट बनवण्यासाठी बारीक करा. ही पेस्ट केसांवर अर्धा तास ठेवल्यानंतर सामान्य पाण्याने धुवा. जर या गोष्टी ताज्या मिळत नसतील तर त्यांची पावडर करून घ्यावी.

2)  जर तुम्ही केस गळण्याच्या समस्येने त्रस्त असाल तर कडूलिंब तुमची समस्या दूर करू शकते. खोबरेल तेलात अँटी-ऑक्सिडंट्स आणि अमीनो अॅसिडने समृद्ध कडूलिंब गरम करून घाला. आता हे तेल गाळून काचेच्या बाटलीत ठेवा. या तेलाचा नियमित वापर केल्यास केसगळती कमी होते.

3) कांद्याचा रस केस अकाली पांढरे होण्याच्या प्रक्रियेला ब्रेक लावतो, तसेच केस काळे करतो. कांद्यामध्ये कॅटालेज नावाचे एन्झाइम आढळते, जे केस पांढरे होण्यापासून तर दूरच पण केस मुळापासून काळे देखील करते. केस काळे करण्यासाठी कांद्याचा वापर हेअर पॅक म्हणून केला जाऊ शकतो.

Web Title: Hair Growth tips : Powerful homemade hair syrum How to grow hair using onion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.