Lokmat Sakhi >Beauty > सध्या कुठले रंग डोक्यावर चढून बसलेत, हायलायटार्समध्ये इन काय?

सध्या कुठले रंग डोक्यावर चढून बसलेत, हायलायटार्समध्ये इन काय?

हायलायटर्स करणारच असाल, तर काही गोष्टी माहित असलेल्या बऱ्या, म्हणजे रंग केसांवर खुलतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 05:30 PM2021-03-24T17:30:15+5:302021-03-24T17:40:36+5:30

हायलायटर्स करणारच असाल, तर काही गोष्टी माहित असलेल्या बऱ्या, म्हणजे रंग केसांवर खुलतात.

hair highlighters, blue, yallow, red are the new trends. | सध्या कुठले रंग डोक्यावर चढून बसलेत, हायलायटार्समध्ये इन काय?

सध्या कुठले रंग डोक्यावर चढून बसलेत, हायलायटार्समध्ये इन काय?

Highlights कॉपर आणि निळ्य़ा रंगात केस रंगवण्याचा ट्रेण्ड तर सध्या खूपच वाढला आहे.

केस. हा केवढा किचकट विषय. खरंतर पार गॉनकेस कारण आपल्या केसांचा पोत, केसांची जाडी, केसांची लांबी, रंग , त्यांचं गळणं याबाबत प्रत्येकीलाच समस्या असतात की डोक्याला केसांचा ताप होतो.
त्यात केस पांढरे होवून अकाली डोक्यावर चांदी पिकायला लागली की मग जाहिरातीत पाहिलेल्या हेअर कलरची याद येतेच. पूर्वी मेहंदी लावणं हा एकमेव ऑप्शन होता. पण ते लालचुटूक केस अनेकांना नको वाटू लागले. नॅचरल कलर दिसण्याची होड सुरु झाली. आणि त्यातच हेअर कलरच्या जाहिरातीतल्या मॉडेलचे कलर केलेले केस जसे दिसतात तसे आपलेही दिसावेत असं अनेकांना वाटू लागलं. बायकांनाही वाटायला लागलं.
आणि मग घरोघरच्या तरुण जगण्यात हेअर कलर नावाचा प्रकार कॉमन झाला.
एकतर पूर्ण केस रंगवले जावू लागले नाही तर मग मधल्या मधल्या केसांना कलर करणं म्हणजेच हायलाईट करणं सुरु झालं. आता तर मस्त उन्हाळा आला आहे, आपल्या डोक्यावर वसंतातले कोणते रंग खुलतील याचा अनेकजण विचार करु लागलेत. ते ही हायलायटर म्हणून.
आता सध्या कुठले रंग डोक्यावर चढून बसलेत विचारा?
 कॉपर आणि निळ्य़ा रंगात केस रंगवण्याचा ट्रेण्ड तर सध्या खूपच वाढला आहे.
चंकी हायलाईट्स करतात. म्हणजे काय तर तर एका रंगानं किंवा दोन रंगाचा वापर करून ग्रीन, पर्पल, ब्ल्यू, प्लॅटीनम असे रंग वापरुन मध्येच केस रंगवले जातात. अशा चमकिल्या रंगांची सध्या समर क्रेझ आहे.

रंगीत केसांच्या तब्येतीला टॉनिक कुठलं?


केस कलर करण्याचा सोस पण त्यांच्या देखभालीचा आनंद असं नेहमी अनेकांचं होतं. पण केस रंगवल्यानंतर ते व्यवस्थित कॅरी करता आले पाहिजेत. ते मेण्टेन करण्यासाठी नियमित शांम्पू आणि कंडीशनर वापरलं पाहिजे. हेअर स्पा, फायबर ट्रीटमेंट घेण्याचा फायदा होतो.
.
पापण्या आणि भुवयांनाही रंग


हल्ली तर पापण्या आणि भुवयाही रंगवल्या जातात. त्यासाठी आय स्ट्रोक हायलाईट्सचा वापर केला जातो. त्यात मुख्यत्वे ब्राऊन कलर वापरला जातो. त्याचप्रमाणो गोल्ड, रेड, मोका, कॉपर, चॉकलेट, ब्राऊन, पर्पल, ब्ल्यू, बरगंडी आणि हिरवा या रंगांचाही वापर केला जातो.

Web Title: hair highlighters, blue, yallow, red are the new trends.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.