Join us  

घरच्या घरी करा पार्लरसारखी केरेटीन ट्रिटमेंट; केस होतील मस्त स्ट्रेट-चमकदार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2023 2:25 PM

Hair Keratin Treatment At Home : अगदी कमीत कमी पदार्थ वापरुन केसांवर केरेटीन ट्रिटमेंट कशी करायची पाहूया

ठळक मुद्देकेमिकल्सचा वापर करुन केसांचा पोत बिघडवण्यापेक्षा घरच्या घरी नैसर्गिक पदार्थ वापरुन ही ट्रीटमेंट करुन पाहाकेस छान सिल्की आणि स्ट्रेट दिसावेत यासाठी सोपा उपाय...

आपले केस जसे असतात तसे आपल्याला अजिबात आवडत नाहीत. ज्यांचे केस सरळ असतात त्यांना भुरे किंवा कुरळे केस आवडतात तर ज्यांचे कुरळे असतात त्यांना स्ट्रेट केस आवडतात. त्यामुळे गेल्या काही वर्षात पार्लरमध्ये जाऊन केस स्ट्रेट करणे किंवा केस कुरळे करुन घेण्याचे प्रमाण वाढले आहे. यासाठी हजारो रुपये तर खर्च होतातच पण केसांवर विविध प्रकारची केमिकल्स वापरल्याने केसांचा पोतही खराब होतो. केस स्ट्रेट केले की ते चमकदार दिसतात आणि सिल्की राहतात (Hair Keratin Treatment At Home). 

स्ट्रेटनिंग, रीबाऊंडनिंग, केरेटीन यांसारख्या ट्रीटमेंटस करुन घेण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षात वाढले आहे. केमिकल्सचा वापर करुन केसांचा पोत बिघडवण्यापेक्षा घरच्या घरी नैसर्गिक पदार्थ वापरुन ही ट्रीटमेंट करता येऊ शकते. इन्स्टाग्रामवर अनु ब्यूटी टिप्स या पेजवर अगदी कमीत कमी पदार्थ वापरुन केसांवर केरेटीन ट्रिटमेंट कशी करायची याबाबत माहिती दिली आहे. ज्यामुळे केस छान सिल्की आणि शायनीही होण्यास मदत होईल, पाहूया ही ट्रिटमेंट कशी करायची...

(Image : Google)

साहित्य 

१. तांदूळ 

२. अंड्याचा पांढरा भाग

३. नारळाचे दूध

४. ऑलिव्ह ऑईल

कृती 

१. १ वाटी भात, अंड्याचा पांढरा भाग आणि नारळाचे दूध एकत्र करुन मिक्सरमधून फिरवून घ्यायचे. 

  २.  ही घट्टसर पेस्ट एका बाऊलमध्ये काढून घेऊन त्यामध्ये ऑलिव्ह ऑईल घालून एकजीव करायचे. 

३. हे मिश्रण केसांना एकसारखे लावावे आणि १ ते २ तास केस न बांधता तसेच ठेवावेत. 

४. त्यानंतर हलक्या शाम्पूने केस स्वच्छ धुवावेत. यामुळे केस एकदम सिल्की आणि शायनी होण्यास मदत होते.   

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी