आपले व्यक्तिमत्व आणि सौंदर्य वाढवण्यात केसांची महत्वाची भूमिका आहे. केसांची निगा राखणं काहींना प्रचंड अवघड जाते. आजकालची धकाधकीची जीवनशैली आणि असंतुलित आहारामुळे केसांच्या समस्या वाढत चालले आहे. केस गळणे, केसांमध्ये कोंडा निर्माण होणे, केसांना फाटे फुटणे अशा समस्या उद्भवतात. केसांची मुळं घट्ट करण्यासाठी तेल मदतगार ठरते. मात्र, काही वेळेला केसांना तेल न लावता देखील केस चिकट आणि तेलकट होतात.
केस तेलकट होण्यामागचे कारणे अनेक आहेत. केस तेलकट असल्यावर उत्तम ड्रेसिंग करूनही तुमचा लूक प्रभावी दिसत नाही. त्यामुळे तुमचा आत्मविश्वासही कमकुवत होतो. जास्त तेलकट किंवा स्निग्ध केसांमुळे तुमच्या टाळूशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत ड्राय शॅम्पूचा वापर करून पाहा. हा शॅम्पू आपण घरगुती साहित्यात बनवू शकता. आता तुम्ही म्हणाल शॅम्पू हा लिक्विड फॉर्ममध्ये असतो, मात्र केसांचे तेलकटपणा काढण्यासाठी हा ड्राय शॅम्पू आपल्याला मदत करेल. हा ड्राय शॅम्पू फक्त दोन साहित्यात बनतो, आणि झटपट बनतो, कोणते आहेत ते साहित्य पाहा.
ड्राय शॅम्पू बनवण्यासाठी लागणारं साहित्य
कोर्न स्टार्च
चारकोल पावडर
कृती
ड्राय शॅम्पू बनवण्यासाठी सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये २ चमचे कोर्न स्टार्च घ्या, त्यात २ चमचे चारकोल पावडर टाका. आणि मिश्रण चांगले मिक्स करा. मिश्रण मिक्स झाल्यानंतर केस विंचरून घ्या.
केस विंचरल्यानंतर भांगेवर ड्राय शॅम्पू चिमुटभर घेऊन टाका. आणि बोटांच्या सहाय्याने पावडर टाळूवर पसरवा. अशा प्रकारे केसांवरील तेलकटपणा कमी होईल. हिवाळ्यात केस लगेच तेलकट होतात. आपल्याला ही ट्रिक नक्कीच कामी येईल.