Join us  

केस गळणं- कमी वयातच पांढरे केस? फक्त ३ योगासनं करा, लांबसडक- काळ्याभोर केसांसाठी खास उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2022 12:43 PM

Exercise That Can Reduce Hair Fall: केसांच्या बाबतीत कोणतीही समस्या जाणवत असेल तर हे काही व्यायाम आणि योगमुद्रा (yogasana for hair care) करून बघा. हा नैसर्गिक उपचार तुम्हाला नक्कीच आवडेल.

ठळक मुद्देस्काल्पला व्यवस्थित रक्तपुरवठा होऊन केसांचे आरोग्य सुधारावे यासाठी हे काही व्यायाम आणि योगमुद्रा करून बघा. 

आजकाल केस गळण्याची समस्या (hair fall) बहुतांश जणींना जाणवत आहे. शिवाय कमी वयातच केस पांढरे होणं (gray hair), केस कोरडे (dry hair) होऊन त्यांना फाटे फुटणं, केसांत कोंडा होणं (dandruff), केसांना अजिबातच वाढ नसणं या समस्यांनीही अनेक जण त्रस्त आहेत. अशा समस्या जाणवू लागल्या की आपण शाम्पू, कंडिशनर किंवा तेल बदलून पाहतो. केसांवर वेगवेगळे केमिकल्स ट्राय करतो. पण या सगळ्या समस्या निर्माण होण्याचं एक प्रमुख कारण म्हणजे डोक्याच्या त्वचेला म्हणजेच स्काल्पला पुरेसा रक्तपुरवठा न होणे हे आहे. म्हणूनच स्काल्पला व्यवस्थित रक्तपुरवठा होऊन केसांचे आरोग्य सुधारावे यासाठी हे काही व्यायाम आणि योगमुद्रा (yogasana and yog mudra for hair problems) करून बघा. 

 

केसांच्या समस्या कमी करणारे व्यायाम आणि योगमुद्राहे उपाय इन्स्टाग्रामच्या theyoginiworld या पेजवर शेअर करण्यात आले आहेत.

व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास होतो? ५ व्यायाम करा, दुखणं कमी होऊन मिळेल आराम१. बालायमयालाच आपण बोली भाषेत नखावर नख घासणं किंवा नेल रबिंग म्हणतो. आपल्यापैकी अनेक जण हा व्यायाम करतही असतील. फक्त हा व्यायाम करताना काही गोष्टी लक्षात ठेवा. पहिले म्हणजे हा व्यायाम ५ ते १५ मिनिटांसाठीच करावा. तसेच जेवण झाल्यानंतर कमीत कमी १- २ तासांचा गॅप ठेवून हा व्यायाम करावा. 

 

२. पृथ्वी मुद्राही मुद्रा करण्यासाठी मरंगळी म्हणजेच करंगळीच्या बाजुचे बोट आणि अंगठा एकमेकांना जोडावी. ५ ते ५० मिनिटांसाठी तुम्ही ही मुद्रा करू शकता. या मुद्रेमुळे केस गळणं तर कमी होईलच पण केस अकाली पांढरे होण्याचे प्रमाणही खूप कमी होईल.

 

३. शिर्षासन किंवा हॅण्डस्टॅण्डशिर्षासन, हॅण्डस्टॅण्ड किंवा शोल्डर स्टॅण्ड असे व्यायाम केल्यामुळे डोक्याच्या भागाला रक्तपुरवठा होण्याचे प्रमाण वाढते. यामुळे केसांच्या अनेक समस्या कमी होतात. तसेच जेव्हा तुम्ही केस विंचराल तेव्हा डोके खाली करा आणि मागून पुढे अशा उलट बाजूने केस विंचरा. यामुळेही डोक्याच्या त्वचेला चांगला रक्तपुरवठा होतो. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीयोगासने प्रकार व फायदेव्यायाम