केस गळण्याची समस्या सध्या खूपच कॉमन झाली आहे. एकदा केस गळायला लागले की शॅम्पू, तेल बदलूनही हवातसा बदल दिसत नाही. केसाचं गळणं वाढतच जातं. खासकरून दिवसभरात जेव्हा जेव्हा तुम्ही केस विंचरता तेव्हा ते जास्त तुटतात. (Hair Care Tips) केमिकल्सयुक्त शॅम्पूचा वापर, कंगव्याची योग्य निवड न करणं यामुळे केसांचं गळणं वाढतं. (Hair fall control tips) घरगुती हेअर सिरम केसांचं गळणं कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यामुळे केसांची वाढ भराभर होईल. याशिवाय केस पांढरे होण्याचा त्रासही कमी होईल. रात्रभर हा स्प्रे केसांना लावून ठेवल्यानं सकारात्मक बदल दिसून येईल. (How to grow hair faster)
केस गळणं कमी करण्याचा हेअर स्प्रे तयार करण्यासाठी सगळ्यात आधी एका कढईत एक ग्लास पाणी घालून त्यात मेथीचे दाणे आणि टी बॅग्स उकळण्यासाठी ठेवा. यात १ ते २ चमचे नारळाचं तेल घालून चांगलं उकळवून घ्या. नंतर गॅस बंद करा आणि एका स्प्रे बॉटलमध्ये हे मिश्रण भरा. (How to control hair fall) केसांना या द्रावणाचा स्प्रे मारून २ तासांसाठी तसेच ठेवा आणि नंतर स्वच्छ पाण्यानं धुवून टाका. तुम्ही हे सिरम रात्रभरही केसांना लावून ठेवू शकता आणि सकाळी सौम्य शॅम्पूनं केस धुवा. यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळेल आणि केस चांगले राहण्यास मदत होईल. (Hair Growth serum)
केसांवर मेथी लावण्याचे फायदे
१) केसांच्या विकासासाठी नारळाचं तेल फायदेशीर ठरतं. मेथीच्या बीया लाल होईपर्यंत नारळाच्या तेलात उकळवून घ्या. त्यानंतर तेल थोडं थंड झाल्यानंतर स्काल्पवर लावा. यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहील आणि केसांची वाढ चांगली होईल.
२) केसांच्या वाढीसाठी प्रोटीन्सची आवश्यकता असते. मेथीचे दाणे वाटून याची पावडर बनवून त्यात मेथीचे तेल किंवा जोजोबा तेल मिसळू शकता. हे हेअर सिरम केसांना लावल्यानं अधिकाधिक फायदे मिळतील.
३) मेथीचा हेअर पॅक केसांसाठी हेल्दी ठरतो हा हेअर पॅक बनवण्याासाठी सगळ्यात आधी मेथीच्या बीया वाटून घ्या. त्यात अंड मिसळा. यात तुम्ही दही सुद्धा घालू शकता. नंतर हा हेअर पॅक आपल्या केसांना लावून अर्ध्या तासासाठी तसेच राहू द्या. यात तुम्ही दहीसुद्धा मिसळू शकता. हा हेअर पॅक केसांना लावून अर्ध्या तासासाठी तसंच सोडा नंतर कोमट पाण्यानं केस स्वच्छ धुवा.
मेथीपासून बनवलेलं हेअर कंडीशनर फक्त केसांना पोषण देत नाही तर स्काल्पमधून कोंडा बाहेर काढण्यास मदत करते. इन्फेक्शनपासून लांब राहता येते. याव्यतिरिक्त पोर्स ओपन होतात. केसांच्या वाढीस चालना मिळते. केसांच्या वाढीसाठी तुम्ही मेथीच्या दाण्यांचा वापर करू शकता.