Join us  

केस नॅचरली स्ट्रेट करण्याचा सोपा उपाय, फक्त २ पदार्थ लावा, केस होतील सिल्की- चमकदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2023 9:12 AM

Hair Care Tips For Freezy Oily Hair: ज्यांचे केस फ्रिजी, तेलकट प्रकारातले आहेत, त्यांच्यासाठी हा एक खूप चांगला घरगुती उपाय आहे.... (Hair mask for naturally straight hair)

ठळक मुद्देहा हेअरमास्क केसांच्या मुळाशी तसेच केसांच्या लांबीवर लावा. यानंतर साधारणपणे अर्ध्या तासाने नेहमीप्रमाणे शाम्पू करून केस धुवून टाका.

काही जणांचे केस खूपच फ्रिजी किंवा चिकट- तेलकट प्रकारातले असतात. हे केस कायम एकमेकांमध्ये गुंतलेले आणि रुक्ष- कोरडे दिसतात. बऱ्याचदा असे केस मोकळे साेडायलाही नको वाटतं. कारण अवघ्या काही मिनिटांतच ते खूप विस्कटतात आणि पिंजारल्यासारखे दिसतात (How to get rid of frizzy hair). अशा केसांसाठी आपण स्ट्रेटनिंग करू शकतो. पण वारंवार स्ट्रेटनिंग केल्याने केसांचं नुकसान होतं. त्यामुळे अशा चिकट केसांना जर नॅचरली स्ट्रेट करायचं असेल तर हा एक घरगुती उपाय करा (Home remedies for silky shiny hair). हा उपाय केल्यामुळे तुमच्या केसांवर छान चमक येऊन ते सिल्की होतील. (Hair mask to make your hair naturally straight)

केस नॅचरली स्ट्रेट करण्याचा उपाय

 

साहित्य

१ केळ

२ टेबलस्पून तांदूळ

सद्गुरू सांगतात तब्येत ठणठणीत ठेवण्यासाठी महिलांनी 'हे' धान्य नेहमीच खावं... हाडं होतील मजबूत

२ टेबलस्पून खोबरेल तेल

उपाय

सगळ्यात आधी तर तांदूळ पाण्यात भिजत घाला आणि ५ ते ६ तास भिजू द्या.

 

यानंतर भिजवलेल्या तांदळाची मिक्सरमधून अगदी बारीक पेस्ट करून घ्या आणि ही पेस्ट शिजवा.

यानंतर मिक्सरमधून केळीची पेस्ट करून घ्या.

बर्कलीच्या कॉलेजमध्ये ह्रतिक- सुजैनच्या मुलाचा डंका, लेकाचं यश पाहून कौतुकाने सुजैन म्हणाली....

आता केळीची पेस्ट, तांदळाची शिजवलेली पेस्ट आणि खोबरेल तेल एका वाटीत एकत्र करा. हा झाला तुमचा केस नॅचरली स्ट्रेट करणारा हेअर मास्क तयार.

हा हेअरमास्क केसांच्या मुळाशी तसेच केसांच्या लांबीवर लावा. यानंतर साधारणपणे अर्ध्या तासाने नेहमीप्रमाणे शाम्पू करून केस धुवून टाका. केस धुतल्यानंतर छान मऊ, स्ट्रेट आणि चमकदार झालेले दिसतील.

१५ दिवसांतून एकदा हा उपाय करावा. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी