Join us  

केस पातळ झाले-वाढतच नाही? नारळाच्या तेलात १ वस्तू मिसळून लावा, लांब-दाट होतील केस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2024 7:17 PM

Hair Oil For Hair Growth (Kes Vadhavnyasathi konta tel lavayche) : केस वाढवण्यासाठी आणि केसांच्या लांबीला पोषण मिळण्यासाठी काही घरगुती उपायही फायदेशीर ठरतात.

केस गळण्याची समस्या आजकाल अनेकांना असते. (Hair Care  Tips) केस गळणं कमी करण्याासठी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करू शकता. केस गळणं कमी करण्यासाठी बाजाराच बरेच उपाय उपलब्ध आहेत. या उपायांमुळे नेहमीच फायदा होतो असं नाही, काही सोप्या ट्रिक्स फॉलो करून तुम्ही केस वाढवू शकता. (Hair Oil For Thick Hairs) केस वाढवण्यासाठी आणि केसांच्या लांबीला पोषण मिळण्यासाठी काही घरगुती उपायही फायदेशीर ठरतात. (Hair Oil For Hair Growth And Thick Hairs)

केसांच्या समस्या टाळण्यसााठी नारळाचे तेल कसे फायदेशीर ठरते?

2015 च्या एका  अभ्यासात संशोधकांनी मानवी केसांवर वनस्पती आधारीत तेलांच्या वापराची चाचणी केली. ३ लेखकांनी नमूद केले  की खोबरेल तेल हे नैसर्गिक केसांच्या प्रोटीनप्रमाणेच आहे. (Ref) नारळाचे तेल हे एकमेव तेल आहे आणि ते प्रथिनांमुळे होणारं नुकसान टाळण्यास मदत करते. ज्यामुळे केसांचे संरक्षण होण्यास मदत होते.

1) केस प्रोटीन, कॅरेटिन, शॅम्पू यापासून तयार झालेले असतात. ज्यामुळे केस गळती उद्भवत नाही आणि केस चांगले राहतात. लांब केसांचे तेल बनवण्यासाठी सगळ्यात आधी तेल गरम करून घ्या. त्यात मूठभर मेथीचे दाणे घाला.

2) मेथीचे दाणे तेलात उकळवून घेतल्यानंतर त्यात कांद्याच्या फोडी, एलोवेराची ताजी पानं चिरून घाला. त्यात कडुलिंबाची आणि जास्वंदाची पानं, कढीपत्त्याची पानं घाला. तेल व्यवस्थित उकळवून घ्या. नंतर गॅस बंद करा आणि भांडे गॅसवरून खाली घ्या नंतर थंड होऊ द्या.

चेहऱ्यावर टॅनिंग आलंय? १ चमचा बेसन पिठात 'हा' पदार्थ मिसळून लावा, तेज येईल-काळपटपणा दूर

3) जवळपास  ३ दिवस हे तेल असेच ठेवा. त्यानंतर हे तेल गाळून एका भांड्यात काढा. गाळणी किंवा कॉटनच्या कापडाच्या साहाय्याने तुम्ही हे तेल गाळू शकता. गाळलेलं तेल केसांना लावा त्यानंतर केसांची हलक्या हाताने मसाज करा.

तरूण्यातच हाडं खिळखिळी करते व्हिटामीन बी १२ ची कमी; ५ पदार्थ खा-मिळवा मजबूत हाडं, अमेरिकन डॉक्टरांचा सल्ला

4) तेल गाळून झाल्यानंतर वर राहिलेल्या साहित्याचा वापर करून तुम्ही हेअर मास्क बनवू शकता. हा हेअर मास्क केसांना लावल्याने केसांची हरवलेली चमक परत येण्यास मदत होते. याशिवाय केस गळणंही कमी होतं. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी