Join us  

केसांना तेल लावण्याची परफेक्ट पद्धत; काही दिवसांत केस वाढतील लांबसडक, होतील दाट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2023 11:13 AM

Hair oiling Tips for Hair Growth : केसांना तेल लावताना काही स्टेप्स लक्षात ठेवल्या तर केसांचा पोत सुधारण्यास नक्कीच मदत होते.

आपले केस छान दाट आणि लांबसडक असावेत असं बहुतांश तरुणी आणि स्त्रियांना वाटतं. पण काही ना काही कारणाने केस खूप गळतात नाहीतर वाढतच नाहीत. केस वाढावेत यासाठी अन्नातून केसांचे पोषण होणे जितके गरजेचे असते तितकीच त्याची योग्य पद्धतीने काळजी घेणेही आवश्यक असते. आपण अनेकदा रोजच्या धावपळीत केसांकडे पुरेसे लक्ष देत नाही. आठवड्याला किंवा १०-१२ दिवसांनी वेळ मिळाला की आपण केसांना रात्री झोपताना तेल लावतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी शाम्पूने ते धुतो. यामुळे केस स्वच्छ होत असले तरी त्यांचे म्हणावे तसे पोषण होत नाही (Hair oiling Tips for Hair Growth). 

मग सणवार आले किंवा काही लग्नकार्य असेल की आपण पार्लरमध्ये जाऊन केसांवर हेअर स्पा, मसाज अशा ट्रिटमेंटस घेतो, हेअर कट करतो आणि ते तात्पुरते चांगले दिसावेत यासाठी प्रयत्न करतो. मात्र यामुळे केसांचा मूळ पोत चांगला होतोच असे नाही. तसेच या सगळ्या प्रक्रियांसाठी बरेच पैसेही खर्च करावे लागतात. पण केस नैसर्गिकरित्या चांगले दिसावेत, दाट व्हावेत आणि लांबसडक वाढावेत यासाठी केसांना तेल लावताना काही गोष्टींचा काळजी घेणे आवश्यक असते. केसांना तेल लावताना काही स्टेप्स लक्षात ठेवल्या तर केसांचा पोत सुधारण्यास नक्कीच मदत होते. पाहूयात यासाठी तेल लावताना नेमके काय करायचे...

१. तेल लावताना सगळ्यात आधी केसांचा गुंता काढून घेणे महत्त्वाचे आहे, त्यामुळे तेल लावण्याची प्रक्रिया सोपी होईल.

२. आपल्या केसांचा पोत लक्षात घेऊन त्यानुसार तेलाची निवड करणे आवश्यक आहे.

- जाड केसांसाठी - एरंडेल तेल आणि खोबरेल तेल किंवा बदाम तेल आणि रोझमेरी तेल

- कोरड्या, भुरभुरीत केसांसाठी - आर्गन ऑईल किंवा जोजोबा ऑईल

- केस पांढरे होत असल्यास - कलौंजीचे तेल, भृंगराज ऑईल, कडीपत्त्याच्या पानांचे तेल

३. केसांचे २ भाग करावेत आणि मग तेल लावावे. 

४. तेल लावल्यानंतर हलक्या हाताने मसाज करावा. 

५. तेल लावल्यानंतर केस ब्रशने विंचरु नयेत.

६. केसांना तेल लावण्यापूर्वी ते थोडे कोमट करावे, जास्त गरम करु नये.

७. केसांची मुळे किंवा केस खूप जास्त खराब असतील तर त्यावर तेल लावू नये केस साध्या पाण्याने धुवून मग तेल लावावे. 

८. तेल लावल्यानंतर साधारण १ ते ३ तास ते केसांत मुरवल्यास पुरेसे असते.    

९. प्रमाणापेक्षा खूप जास्त तेल लावू नका.     

१०. ही सगळी पद्धत वापरुन आठवड्यातून २ तेल लावल्यास केस चांगले राहण्यास मदत होईल. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी