Lokmat Sakhi >Beauty > अभिनेत्रींच्या दाट केसांचं सोपं सिक्रेट -रोज करतात ३ गोष्टी, तुम्हीही फॉलो करा-मिळवा लांब केस

अभिनेत्रींच्या दाट केसांचं सोपं सिक्रेट -रोज करतात ३ गोष्टी, तुम्हीही फॉलो करा-मिळवा लांब केस

Hair Secrets of Indian Actresses :केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी तुम्ही अभिनेत्रींप्रमाणे हेअर ब्युटी सिक्रेट्स ट्राय करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 09:07 AM2023-12-13T09:07:00+5:302023-12-13T14:00:44+5:30

Hair Secrets of Indian Actresses :केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी तुम्ही अभिनेत्रींप्रमाणे हेअर ब्युटी सिक्रेट्स ट्राय करू शकता.

Hair Secrets of Indian Actresses : Bollywood Celebrities Hair care Secrets For Long Beautiful Hairs | अभिनेत्रींच्या दाट केसांचं सोपं सिक्रेट -रोज करतात ३ गोष्टी, तुम्हीही फॉलो करा-मिळवा लांब केस

अभिनेत्रींच्या दाट केसांचं सोपं सिक्रेट -रोज करतात ३ गोष्टी, तुम्हीही फॉलो करा-मिळवा लांब केस

साऊथच्या अभिनेत्री असोत किंवा बॉलिवूडच्या, लांब आणि शायनी केसांच्या बाबतीत या सर्वांनाच मागे टाकतात. या अभिनेत्री केसांना काय लावतात त्यांच्या दाट लांबसडक केसांचे सिक्रेट काय असा प्रश्न सर्वांना पडतो. ( Bollywood Celebrities Haircare Secrets For Long Beautiful Hairs) केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी तुम्ही अभिनेत्रींप्रमाणे हेअर ब्युटी सिक्रेट्स ट्राय करू शकता. त्याचे हेअर केअर रूटीन कसं कसं, महागड्या उत्पादनांऐवजी केसांवर कोणती उत्पादनं वापरतात ते पाहूया. (Hair Secrets of Indian Actresses) 

१) करिना

अभिनेत्री करिना कपूर खानचे केस लहानपणापासूनच हेल्दी आणि स्ट्राँग आहेत. ती आपल्या केसांची व्यवस्थित काळजी घेते. आपल्या ४ ते ५ फेव्हरेट हेअर ऑईल्सने ती कायम मसाज करते. यात कोकोनट ऑईल, ऑलिव्ह ऑईल  आणि आल्मंड ऑईल केसांच्या आरोग्यासाठी उत्तम ठरतो. केस शॅम्पूने धुतल्यानंतर तुम्ही ड्रायरचाही वापर करू शकता. ज्यामुळे केसांना एक्स्ट्रा वॉल्यूम येईल.

२) कटरिना

आपल्या केसांची काळजी घेण्यासाठी कटरिना रोज केसांची रूट मसाज करते. हेअर मसाजसाठी तुम्ही चांगले हर्बल हेअर ऑईल आणि फ्रुट ऑईल युज करू शकता. हेअर मसाज करण्यासाठी हर्बल हेअर ऑईल तर कधी फ्रुट ऑईलचा वापर करू शकता. रेग्युलर हेअर स्पा घेतल्याने केसांना डिप कंडिशनिंग मिळते याशिवाय केस नेहमीच हेल्दी आणि शायनी राहतात. सुंदर दिसण्यात केसांची महत्वाची भूमिका असते. 

थंडीत चेहरा काळवंडला-त्वचा ताणल्यासारखी झाली? मुल्तानी मातीचा १ उपाय, सॉफ्ट-ग्लोईंग दिसेल त्वचा

३) दीपिका

दीपिका आपल्या केसांची खास काळजी करते. दीपिका आपल्या केसांची घेण्यासाठी कोकोन ऑईलने हेअर मसाज करते. जेणेकरून धूळ, ऊन आणि प्रदूषणामुळे केस  डॅमेज होणार नाहीत आणि केस  रिपेअर होतील. यानंतर तुम्ही माईल्ट शॅम्पूचा वापर करते. 

४) आलिया

आलिया आपल्या केसांना सुंदर ठेवण्यासाठी व्हिटामीन ए ने परिपूर्ण डाएट घेते. ऑल्टरनेट डे शॅम्पूने केस धुते. यामुळे स्काल्प मजबूत राहण्यास मदत होते.  केसांच्या सुंदरतेचं सिक्रेट शेअर करत आलियाने एका इंटरव्यूमध्ये सांगितले की केसांच्या सुंदरतेसाठी व्हिटामीन ए युक्त डाएट घ्यायला हवं. एक दिवसाआड शॅम्पूने केस धुवायला हवे. यामुळे स्काल्प मजबूत राहतो.

दातांना आतून कीड-वरून पिवळा थर आलाय? १ उपाय करा-दाताची कीड लगेच बाहेर येईल 

५) साई पल्लवी

साई पल्लवी आपल्या साधेपणामुळे बरीच ओळखली जाते. साई पल्लवीच्या केसांचे आणि त्वचेचे नेहमीच कौतुक होत असते. आपल्या केसांना सुंदर ठेवण्यासाठी साई पल्लवी नैसर्गिक पदार्थांचा वापर करते. साईचे केस कंबरेपर्यंत लांब आहेत. ती तिच्या केसांना चांगले ठेवण्यासाठी  कमीत कमी केमिकल्सयुक्त क्रिमचा वापर करते. 

Web Title: Hair Secrets of Indian Actresses : Bollywood Celebrities Hair care Secrets For Long Beautiful Hairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.