Lokmat Sakhi >Beauty > केस शेपटीसारखे निमुळते-पातळ झाले? 'हा' घरगुती पॉवरफुल हेअरस्प्रे लावा; घनदान होतील केस

केस शेपटीसारखे निमुळते-पातळ झाले? 'हा' घरगुती पॉवरफुल हेअरस्प्रे लावा; घनदान होतील केस

Hair Spray For Long Hairs (Kes Vadhavnyache Upay) : केस गळणं थांबवण्यासाठी केमिकल्सयुक्त स्प्रे न वापरता तुम्ही घरगुती उपायांचा वापर करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 09:02 AM2024-01-11T09:02:00+5:302024-01-11T11:51:02+5:30

Hair Spray For Long Hairs (Kes Vadhavnyache Upay) : केस गळणं थांबवण्यासाठी केमिकल्सयुक्त स्प्रे न वापरता तुम्ही घरगुती उपायांचा वापर करू शकता.

Hair Spray For Long Hairs : How to Get Long Hairs Using Home made Hair Spray | केस शेपटीसारखे निमुळते-पातळ झाले? 'हा' घरगुती पॉवरफुल हेअरस्प्रे लावा; घनदान होतील केस

केस शेपटीसारखे निमुळते-पातळ झाले? 'हा' घरगुती पॉवरफुल हेअरस्प्रे लावा; घनदान होतील केस

केस गळण्याची समस्या आजकाल कोणत्याही वयोगटात उद्भवते. (Hair Fall Control Tips) सतत केस मोकळे सोडल्याने, केसांवर  हिटींग टुल्स वापरल्यामुळे केस जास्त गळू लागतात. केसांचे गळणं थांबवण्यासाठी बाजारात बरेच उपाय उपलब्ध आहेत. पण हजारो रूपये खर्च करूनही केसांवर चांगला परिणाम दिसून येत नाही. (How to Stop Hair Fall Faster)  केस गळणं थांबवण्यासाठी केमिकल्सयुक्त स्प्रे न वापरता तुम्ही घरगुती उपायांचा वापर करू शकता. हा उपाय करण्यासाठी  स्वंयपाकघरात उपलब्ध असलेलं बेसिक साहित्य लागेल. या साहित्याचा वापर करून तुम्ही लांबचलांब केस मिळवू शकता. (Hair Spray For Long Hairs)

केसांसाठी घरगुती स्प्रे कसा तयार करायचा? (How To Make Homemade Hair Spray)

एक कप पाण्यात २ ते ३ चमचे मेथी, २ चमचे कलौंजी, २ चमचे चहा पावडर, कढीपत्ता आणि कांद्याची सालं घालून शिजवून घ्या. थंड झाल्यानंतर गाळून हे पाणी बॉटलमध्ये भरून ठेवून द्या. स्काल्पवर या पाण्याने स्प्रे करून अंघोळीच्या आधी केसांना लावा. त्यानंतर स्वच्छ केस धुवा. या उपायाने केसांची चांगली वाढ होईल आणि लांबचलांब केस वाढतील.

घरगुती उपाय केसांवर करण्याचे फायदे (Benefits Of Homemade Liquid For Hairs)

चांगला परिणाम दिसून येण्यासाठी जवळपास ९० दिवस हा उपाय करा. १ टेबलस्पून मेथीच्या  दाण्यांमुळे केस दाट आण सरळ होतील.  कलोंजीच्या वापराने केसांना शाईन येते. १ टेबसल्पून चहाच्या पानांमुळे केसांनाही नवीन लूक, तेज येते. आल्याच्या वापराने केस वाढण्यास मदत होते.  तर कांद्याची साल स्काल्पला पोषण देण्यास मदत करते.

अंघोळ करण्याच्या १ तास आधी हे लिक्विड केसांना लावा यामुळे केस लांबच लांब होतील आणि वाढही चांगली होईल. केसांसाठी तयार करण्यात आलेलं हे घरगुती लिक्विड तुम्ही फ्रिजमध्येही ठेवू शकता. जमेल तेव्हा केसांवर या पाण्याने स्प्रे करून केस स्वच्छ धुवून टाका.

अंगदुखी-अशक्तपणा-कॅल्शियम कमी झालं? रामदेव बाबा सांगतात ५ उपाय, हाडं होतील बळकट

व्हिटामीन ए ने परिपूर्ण कांद्याची सालं केसांच्या आरोग्यासाठी चांगले असते. केसांचा पोत सुधारण्यासही मदत होते. व्हिटामीन ई मुले त्वेचेचं संक्रमण रोखण्यास मदत होते आणि इम्यूनिटी वाढते. व्हिटामीन ई ने परिपूर्ण अससल्यामुळे स्काल्पच्या त्वचेचे आरोग्य चांगले राहते. 
 

Web Title: Hair Spray For Long Hairs : How to Get Long Hairs Using Home made Hair Spray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.