केसांचे सौंदर्य आणि आरोग्य चांगले राखण्यासाठी आजकाल अनेक ब्यूटी ट्रिटमेंट्स आल्या आहेत. केसांच्या प्रत्येक प्रकारच्या समस्येवर आपण वेगवेगळ्या हेअर ब्यूटी ट्रिटमेंट्स करतो. या हेअर केअर ब्यूटी ट्रिटमेंट्सचा प्रभाव काहीवेळा चांगला टिकून राहतो तर कधी केसांवर उलट परिणाम देखील होऊ शकतात. हेअर केअर ब्यूटी ट्रिटमेंट्स करताना केसांसाठी अनेक केमिकल्सयुक्त प्रॉडक्ट्सचा वापर केला जातो. काहीवेळा या केमिकल्समुळे केसांच्या समस्या कमी होण्याऐवजी वाढतात. केसगळती, केसं तुटते, केसांना फाटे फुटणे, केसांची वाढ थांबणे, केस रुक्ष निस्तेज होणे यांसारख्या केसांच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते(How to Repair & Prevent Split Ends).
केसांसाठी केमिकल्सयुक्त ब्यूटी ट्रिटमेंट्स केल्याने केसांच्या नैसर्गिक तेल ग्रंथींवर वाईट परिणाम होतात, ज्यामुळे केस कोरडे आणि निर्जीव होतात. याशिवाय केमिकल ट्रिटमेंट्समुळे केसांचा रंगही बदलू शकतो आणि केस खराब होण्याचीही समस्याही होऊ शकते. केमिकल्सयुक्त ब्यूटी ट्रिटमेंट्स करुन खराब झालेले केस आपण पुन्हा नव्यासारखे मऊ, मुलायम करु शकतो. केसांसाठी सतत केमिकल्सयुक्त प्रॉडक्टसचा वापर करत असाल आणि यामुळे केसांच्या अनेक समस्या सूरू झाल्या असतील तर केसांची काळजी घेण्यासाठी काही घरगुती टिप्स लक्षात ठेवूयात(Homeremedy For Long Hair With Split Ends Problem Due To Chemical Treatment).
१. गुलाबपाण्याच्या स्प्रे :- केसांसाठी हा स्प्रे तयार करताना ४ थेंब रोझमेरी इसेंन्शियल ऑइल, ३ टेबलस्पून गुलाब पाणी, १ टेबलस्पून नारळाचे तेल असे साहित्य लागेल. हे सर्व साहित्य एका स्प्रे बॉटलमध्ये एकत्रित करुन घ्यावे. केस धुतल्यानंतर केसांवर हा स्प्रे करावा. गुलाब पाणी केसांना हायड्रेट करते आणि रोझमेरी इसेंन्शियल ऑइल केसांच्या वाढीस प्रोत्साहन देते. खोबरेल तेल केसांना पोषण देते आणि ते मऊ बनवते.
२. नारळाच्या दुधाचा हेअर पॅक :- हा घरगुती हेअर पॅक तयार करण्यासाठी आपल्या १ कप नारळाचे दूध, १ टेबलस्पून लिंबाचा रस, १ टेबलस्पून गुलाबपाणी इतके साहित्य लागेल. एका बाऊलमध्ये हे सर्व साहित्य मिक्स करुन हा हेअर पॅक तयार करुन घ्यावा. तयार हेअरपॅक केसांवर लावून ३० मिनिटे तसेच ठेवून द्यावे. त्यानंतर केस धुवून घ्यावेत. नारळाच्या दुधामुळे केसांचे पोषण होते आणि ते मजबूत होतात. लिंबाचा रस केसांना चमकदार करतो आणि गुलाब पाणी केसांच्या सौंदर्यासाठी अधिक फायदेशीर असते.
चहा-कॉफी पिताना कपवर लिपस्टिकचे डाग पडू नयेत म्हणून खास ट्रिक- लिपस्टिकही पुसली जाणार नाही...
३. आर्गन हेअर ऑइल :- १ टेबलस्पून खोबरेल तेल, ५ थेंब आर्गन हेअर ऑइल, ५ टेबलस्पून ऑलिव्ह ऑइल असे सगळे घटक एकत्रित मिक्स करुन घ्यावे. हा हेअर मास्क रात्रभर केस आणि स्काल्पवर तसाच लावून ठेवा. सकाळी केस स्वच्छ धुवा. आर्गन ऑइल केसांना आर्द्रता देते आणि कोरडेपणापासून संरक्षण करते. खोबरेल तेल आणि ऑलिव्ह ऑइल केसांना पोषण देतात आणि त्यांना चमकदार बनवतात.
घ्या फक्त चमचाभर साजूक तूप, पायाच्या भेगा - फुटलेले ओठ- कोरडी त्वचा होईल पुन्हा मऊ, मुलायम...
इतरही गोष्टी लक्षात ठेवा...
१. आठवड्यातून २ ते ३ वेळा केस धुवा.
२. केस गरम पाण्याऐवजी थंड पाण्याने धुवा.
३. केस विंचरताना हलक्या हाताने विंचरावेत.
४. सूर्यकिरणांपासून केसांचे संरक्षण करा.
५. हेअर ड्रायर जपून वापरा.