Lokmat Sakhi >Beauty > केस विंचरताना फार गळतात? जावेद हबीबचे ५ उपाय, भराभर वाढतील-दाट होतील केस

केस विंचरताना फार गळतात? जावेद हबीबचे ५ उपाय, भराभर वाढतील-दाट होतील केस

Basic care tips for all types of hair by Jawed Habib : केसाचं गळणं रोखण्यासाठी केमिकल्सयुक्त उत्पादनांचा वापर केल्यास साईड इफेक्ट्सही जाणवतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2023 11:14 AM2023-08-05T11:14:00+5:302023-08-05T13:14:50+5:30

Basic care tips for all types of hair by Jawed Habib : केसाचं गळणं रोखण्यासाठी केमिकल्सयुक्त उत्पादनांचा वापर केल्यास साईड इफेक्ट्सही जाणवतात.

Hair tips for all types of hair by Jawed Habib : Jawed Habib Shares Easy Tips To Prevent Hair Fall | केस विंचरताना फार गळतात? जावेद हबीबचे ५ उपाय, भराभर वाढतील-दाट होतील केस

केस विंचरताना फार गळतात? जावेद हबीबचे ५ उपाय, भराभर वाढतील-दाट होतील केस

महिलांमध्ये केस गळण्याचा प्रॉब्लेम  सामान्य आहे. आपले केस लांब-दाट असावेत असं प्रत्येकाला वाटतं.  जास्त टेंशन घेणं, गर्भावस्थात, प्रोटीन्सची कमतरता, वजन कमी होणं यांसारख्या गंभीर आरोग्यसंबंधित समस्यांमुळे हेअर फॉल वाढतो. याची काही सामान्य कारणंसुद्धा आहेत. अनेक हेअर ट्रिटमेंट्स आणि हेअर सप्लिमेंट्स ही समस्या दूर करण्याचा दावा करतात. केसाचं गळणं रोखण्यासाठी केमिकल्सयुक्त उत्पादनांचा वापर केल्यास साईड इफेक्ट्सही जाणवतात.अशावेळी काही घरगुती उपाय तुम्हाला सोल्यूशन देऊ शकतात. हेअर एक्सपर्ट जावेद हबीब यांनी या समस्येपासून बचावासाठी सोपे उपाय सांगितले आहेत. (Basic care tips for all types of hair by Jawed Habib)

1) नारळाचं तेल

नारळाचं तेल केसांसाठी वरदानाप्रमाणे आहे. हे केसाच्या मुळाशी जाऊन केस गळणं  थांबवते. आठवड्यातून २ वेळा नारळाचं तेल कोमट करून या तेलानं मसाज केल्यास केसांची वाढ भराभर होते.

२) आवळा

आवळ्यात व्हिटामीन सी मोठ्या प्रमाणात असते यामुळे केस मजबूत होतात. केसाचं गळणं थांबवण्यासााठी हा उत्तम उपाय आहे. ज्यामुळे केस अवेळी पांढरे होत नाहीत. आवळा पावडर आणि लिंबाचा रस व्यवस्थित मिसळून याची पेस्ट बनवा आणि स्काल्पला लावा.  शॉवर कॅप लावून झाकून ठेवा नंतर केस धुवा.  

३) एलोवेरा

केसाचं गळणं थांबवण्यासाठी आणि केस वाढण्यासाठी एलोवेरा एक प्रभावी घरगुती उपाय आहे. यामुळे स्काल्पच्या समस्या खाज,  डॅड्रफ कमी होतो. एलोवेरा जेल केसांना लावून जवळपास ४५ मिनिटं तसेच ठेवा नंतर साध्या पाण्यानं केस धुवा.  आठवड्यातून ३ ते ४ वेळा हा प्रयोग केल्यास चांगला परिणाम दिसून येईल.

४) कांदा

कांदा सल्फरयुक्त असतो. केसांवर कांदा वापरल्यानं ब्लड  सर्क्युलेशन चांगले राहते. यामुळे केसांची चांगली वाढ होते आणि केस गळणं थांबतं. सल्फर स्काल्प इन्फेक्शनशी लढण्यासाठीही गुणकारी ठरतो. कांद्याच्या रसात एक कॉटन बॉल बुडवून केसांना लावा. २० ते ३० मिनिटासांठी तसेच ठेवा नंतर सौम्य शॅम्पूनं केस धुवा. 

५) कडूलिंबाची पानं

कडुलिंबाच्या पानांत एंटी फंगल, एटी बॅक्टेरिअल आणि एंटी इफ्लेमेटरी गुण असतात. यामुळे कोंड्यापासून सुटका मिळते. कडुलिंबाची  १० ते १२ पानं घ्या आणि पाण्यात उकळवा पाणी अर्ध झाल्यानंतर गॅस बंद करा आणि या पानांची पेस्ट करून स्काल्पला लावा. ३० मिनिटांसाठी ही पेस्ट तशीच ठेवा आणि पाण्यानं धुवा. आठवड्यातून २ वेळा हा प्रयोग केल्यास चांगला परिणाम दिसून येईल.

Web Title: Hair tips for all types of hair by Jawed Habib : Jawed Habib Shares Easy Tips To Prevent Hair Fall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.