Join us  

केस धुण्याचा कंटाळा येतो-धुतले की खूप गळतात? केसांचा पोत ओळखा-बघा कितीवेळा केस धुवावे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 2:43 PM

Hair Washing Tips : शॅम्पूनं केस धुतल्यानतंर चेहऱ्यावरही एकदम फ्रेश लूक येतो आणि चेहऱ्यावरचा तेलकटपणा कमी होतो.

सुंदर,  मुलायम केस सौंदर्यात भर घालतात. सॉफ्ट, सिल्की केस मिळवण्यासाठी लोक रोज केस धुतात तर काहीजण आठवड्यातून २ ते ३ वेळा केस धुतात. (Hair Washing Tips)  शॅम्पूनं केस धुतल्यानतंर चेहऱ्यावरही एकदम फ्रेश लूक येतो आणि चेहऱ्यावरचा तेलकटपणा कमी होतो. तर काहीजणांचे केस लांब असल्यामुळे त्यांना केस धुवायला खूप कंटाळा येतो म्हणूनच ते  केस धुणं टाळतात.  बरेच दिवस केस न धुतल्यामुळे केसांवर काय परिणाम होतो ते समजून  घेऊ. (How to Wash Your Hair Steps, Methods, Water Type, & More)

रोज केस धुणं टाळावे कारण शॅम्पूमध्ये केमिकल्स असतात ज्यामुळे केसांचे नैसर्गिक तेल संपते. हळूहळू केस रुक्ष आणि कोरडे दिसू लागतात आणि स्काल्पवर कोरडेपणा येतो. अमेरीकन एकॅडमी ऑफ डर्मोटोलॉजी असोसियेशनच्या रिसर्चनुसार शॅम्पूने केस धुताना करताना तुम्ही त्वचा, हेअर टाईप आणि वयाचा विचार करायला हवा.  हेअर केअर रुटीन फॉलो करायला हवं. (Best Hair Wash Tips To Wash Your Hair The Right Way)

तेलकट स्काल्पसाठी कोणता शॅम्पू वापरायचा?

काहीजणांच्या स्काल्पची त्वचा खूपच तेलकट असते. शॅम्पू केल्यानंतर थोड्यावेळानंतर केसांवर तेल दिसू लागतं. केस  चिकट होऊ नयेत यासाठी काहीजणी रोज केस धुतात. जर तुम्हालाही स्काल्प तेलकट वाटत असेल तर तुम्ही रोज केस न धुता एक दिवस आड केस धुवू शकता. यामुळे तुमचे केस  मजबूत राहतील आणि एक्स्ट्रा ऑईल येणार नाही. बरेच दिवस केस न धुतल्यामुळे स्काल्प तेलकट होऊन केसांमध्ये धूळ बसू शकते.

नारळाचे साल कचऱ्यात फेकता? थांबा, पांढरे केस काळेभोर होतील-या पद्धतीनं लावा नारळाचे साल

केमिकल ट्रिटमेंटनंतर शॅम्पू

जर तुम्ही कोणत्याही प्रकारची केमिकल ट्रिटमेंट केली केसांवर केली असेल तर तुम्हाला केसांची एक्स्ट्रा काळजी घ्यावी लागेल. केमिकल्स ट्रिटमेंट जसं की स्मूदनिंग, हेअर स्ट्रेटनिंग कलर किवा कोणतीही इतर ट्रिटमेंट केल्यामुळे केस फारच कोरडे होतात. अशात कमीत कमी वेळा शॅम्पूने केस धुवावेत. केसांना १ ते २ वेळा शॅम्पूने धुवा. यामुळे केसांवर ट्रिंटमेंट टिकून राहील.

काळे कमी पांढरे केस जास्त दिसतात? १ तास हा पदार्थ केसांना लावा-मुळापासून काळे होतील केस

वयानुसार शॅम्पूची निवड करा

केसांची वयानुसार काळजी घ्यायला हवी. केसांची वाढ होते तेव्हा शरीरातील ऑईल कमी होते. अशात स्काल्पवर कोरडेपणा  येतो. वाढत्या वयात स्काल्पवर ऑईल येते. जर कोंड्यामुळे केसांवर पांढरा थर तयार होत असेल तर केस धुवायलाच  हवेत.   कारण कोंड्यामुळे त्वचेच्या इतर समस्या उद्भवू शकता.     

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी