Lokmat Sakhi >Beauty > केस धुताना गळतात - पांढरेही झालेत? शाम्पूमध्ये चिमुटभर घाला ही सोनेरी गोष्ट; केस होतील दाट

केस धुताना गळतात - पांढरेही झालेत? शाम्पूमध्ये चिमुटभर घाला ही सोनेरी गोष्ट; केस होतील दाट

HAIR WASHING TIPS THAT WILL GROW YOUR HAIR OUT! : केस धुताना शॅम्पूमध्ये १ पदार्थ मिसळा; अजिबात केस गळणार नाहीत..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2024 10:00 AM2024-08-13T10:00:13+5:302024-08-13T10:05:01+5:30

HAIR WASHING TIPS THAT WILL GROW YOUR HAIR OUT! : केस धुताना शॅम्पूमध्ये १ पदार्थ मिसळा; अजिबात केस गळणार नाहीत..

HAIR WASHING TIPS THAT WILL GROW YOUR HAIR OUT! | केस धुताना गळतात - पांढरेही झालेत? शाम्पूमध्ये चिमुटभर घाला ही सोनेरी गोष्ट; केस होतील दाट

केस धुताना गळतात - पांढरेही झालेत? शाम्पूमध्ये चिमुटभर घाला ही सोनेरी गोष्ट; केस होतील दाट

दिवसातून २ - ३ वेळा केस विंचरणे, आठवड्यातून २ वेळा तेल लावून मसाज करणे, २ वेळा केस धुणे हा रुटीन अनेक महिलावर्ग फॉलो करतात (Hair care Tips). पण तरीही केसांच्या समस्या सुटत नाहीत (Hair Growth). केस गळतात, पांढरे होतात आणि स्काल्पवर कोंडा होतो तो वेगळाच. केस धुताना अनेक महिलांकडून चुका होतात. ज्यामुळे केस धुताना किंवा धुतल्यानंतर फार गळतात.

मेहनत आणि निगा राखून वाढवलेले केस गळल्यानंतर खूप त्रास होतो, स्ट्रेसही येतो. जर केस धुताना केस तुमचेही गळत असतील तर, शाम्पूमध्ये काही गोष्टी घालून केस धुवून घ्या. यामुळे केस गळणं थांबेल. शिवाय योग्य वाढही होईल. केस फार गळत असतील तर, हा घरगुती उपाय नक्कीच उपयुक्त ठरेल(HAIR WASHING TIPS THAT WILL GROW YOUR HAIR OUT!).

केस धुताना शाम्पूमध्ये कोणती गोष्टी घालावी?

लागणारं साहित्य

फरशीची चमक हरवली? लादी पुसण्याच्या पाण्यात घाला ४ गोष्टी; फरशी चमकेल - घर प्रसन्न राहील..

शाम्पू

हळद

पिठीसाखर

अशा पद्धतीने शाम्पूने केस धुवा


सर्वात आधी एका बाऊलमध्ये एक चमचा आपल्या आवडीचा शाम्पू घ्या. त्यात अर्धा चमचा हळद, एक चमचा पिठीसाखर आणि ३ चमचे पाणी घालून मिक्स करा.

केस आधी धुवून घ्या. नंतर केसांवर तयार शाम्पू घालून स्काल्पवर मसाज करा. ५ मिनिटानंतर केस स्वच्छ धुवून घ्या. या पद्धतीने केस धुतल्यास केसांना नक्कीच फायदा होईल.

डाळ - तांदूळ भिजवण्याची झंझटच कशाला? अगदी १० मिनिटात रवा - बटाट्याचा करा कुरकुरीत डोसा

केसांसाठी हळदीचे फायदे

हळद केसांसाठी हेअर टॉनिक म्हणून काम करते. हळदीतील अँटी-सेप्टिक, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांमुळे केसांच्या अनेक समस्या सुटतात. खरंतर हळदीमध्ये उपस्थित कर्क्युमिन नावाच्या संयुगात अँटीऑक्सिडेंट असतात, ज्यामुळे केस पांढरे होण्याची समस्या कमी होते. शिवाय केस गळतीही थांबते.

Web Title: HAIR WASHING TIPS THAT WILL GROW YOUR HAIR OUT!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.