आपल्या सौंदर्यातील महत्त्वाचा भाग असलेल्या केसांबाबतच्या अनेक समस्या आपल्याला उद्भवत असतात. कधी केस गळणे, केसांत होणारा कोंडा, केसांना फुटणारे फाटे, केस रुक्ष होणे आणि केस पांढरे होणे अशा एकाहून एक समस्यांचा Hair care tips समावेश असतो. कमी वयात केस पांढरे White hairs in young age होणे ही हल्ली एक मोठी समस्या झाली आहे. अगदी शाळा, कॉलेजमध्ये असलेल्या मुलांपासून ते चाळीशीतच केस पांढरे झाल्याची समस्या असणारे अनेक जण आपल्या आजुबाजूला असतात. डाय लावल्याने केसांवर त्याचा विपरीत परिणाम होतो आणि केसांचा पोत बिघडतो. याबरोबरच डायमुळे केस आहेत त्याहून जास्त पांढरे व्हायला लागतात. अशावेळी केसांना मेहंदी लावणे हा एक पर्याय असू शकतो. पण मेहंदीमुळे केस केशरी दिसतात आणि ते बऱ्याच जणांना आवडतातच असे नाही. आयुर्वेदात मात्र पांढरे केस काळे होण्यासाठी एकाहून एक उत्तम उपाय सांगितले आहेत. आवळा, कोरफड, भृंगराज यांसारख्या औषधी वनस्पतींचा केसांच्या विविध समस्या दूर होण्यास मदत होते. भृंगराज Bhringraj या औषधी वनस्पतीचे केसांचा पांढरेपणा कमी होण्यासाठी Tips to get rid of White hairs कसा उपयोग होतो पाहूयात...
भृंगराज तेलाने मसाज
भृंगराज या वनस्पतीपासून बरीच सौंदर्यप्रसाधने तयार केली जातात. यामध्ये भृंगराज तेल, भृंगराज पावडर यांसारख्या गोष्टींचा समावेश होतो. विकतच्या भृंगराज तेलाबाबत तुम्हाला शंका असेल तर तुम्ही घरच्या घरीही अगदी सोप्या पद्धतीने हे तेल तयार करु शकता. ३ चमचे भृंगराज पावडर, १ कप खोबरेल तेल आणि १ चमचा मेथीचे दाणे घ्या. आता एका पॅनमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. दोन ते तीन मिनीटे तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मेथीचे दाणे आणि भृंगराज पावडर घाला. लहान गॅसवर हे तेल १० मिनीटांसाठी गरम करा. तेलाचा रंग हिरवा झाल्यावर हे तेल एका बाऊलमध्ये घ्या. गार झाल्यावर या तेलाने केसांना हलका मसाज करा. आठवड्यातून दोन वेळा भृंगराजने केसांना मसाज केल्यास पांढरे केस काळे होण्यास मदत होईल.
भृंगराज आणि आवळा
आवळा पावडर आणि भृंगराज पावडर एकत्र करा आणि ताकात भिजवा. याची घट्टसर पेस्ट तयार करुन ती केसांना लावा. केसांच्या मूळांना आणि वरच्या बाजूने ही पेस्ट लावा. यामुळे केसांतील कोंड्याची समस्या तर दूर होईलच पण केसांचा पांढरेपणा कमी होण्यासही या पोस्टचा अतिशय चांगला उपयोग होईल. आवळ्यामध्ये अँटिऑक्सिडेंट गुणधर्म आणि व्हिटॅमिन ई सारखे गुणधर्म असतात, ज्यामुळे केसांना अनेक प्रकारे फायदा होतो.
भृंगराज पावडर आणि तिळाचे तेल
पांढरे केस काळे करायचे असतील तर भृंगराज पावडर तिळाच्या तेलात एकत्र करा. तुमचे केल लहान असतील तर याचा अतिशय चांगला उपयोग होऊ शकतो. यासाठी आधी तिळाचे तेल थोडे कोमट करा त्यामध्ये केसांच्या आकाराप्रमाणे भृंगराज पावडर घाला. आता हे दोन्ही पुन्हा गरम करा. काळा रंग येईपर्यंत हे मिश्रण ढवळत राहा. गार झाल्यानंतर घट्टसर पेस्ट केसांच्या मूळांना लावा. हा सोपा उपाय तुम्ही आठवड्यातून दोन वेळा केलात तर तुम्हाला काही दिवसांतच तुमच्या केसांमध्ये फरक जाणवेल. हे मिश्रण केसांना लावल्यानंतर साधारण ४० मिनीटांसाठी तसेच ठेवा. त्यानंतर हलक्या शाम्पूने केस धुवा.
भृंगराज पावडरपासून तयार करा हेअर पॅक
वेगवेगळ्या प्रकारच्या घरगुती हेअर पॅकमुळे केसांचा पोत सुधारण्यास मदत होते. केस मुलायम होण्यासाठी तसेच केसातील कोंडा कमी होण्यासाठी अनेक प्रकारचे हेअरपॅक लावले जातात. अशाच प्रकारे भृंगराज पावडर आणि शिकेकाई यांच्यापासून तयार केलेला हेअरपॅक पांढरे केस कमी होण्यासाठी उपयुक्त ठरतो. लोखंडाच्या कढईत हा पॅक केल्यास त्याचा आणखीनच चांगला फायदा होतो. लोखंडाच्या कढईत पाणी घेऊन ते ५ मिनीटे उकळा. त्यानंतर आपल्या केसांच्या लांबीनुसार त्यामध्ये भृंगराज पावडर आणि शिकेकाई घाला. त्यामध्ये कलौंजी म्हणजेच कांद्याच्या बियांची पावडरही घाला. या तिन्ही गोष्टी पाण्यात चांगल्या उकळल्या की गॅस बंद करा. मग हा हेअर पॅक रात्रभर लोखंडाच्या कढईत ठेवा, दुसऱ्या दिवशी केसांना लावा. हा पॅक पेस्टसारखा व्हायला हवा, जास्त पातळ झाल्यास तो केसांना लावणे अवघड होते.
भृंगराज अर्काचे सेवन
सध्या बाजारात भृंगराजच्या गोळ्याही मिळतात. आयुर्वेदीक औषधी मिळणाऱ्यांकडे या गोळ्या अगदी सहज मिळतात. केवळ केसांसाठीच नाही तर आरोग्याच्या इतर तक्रारींवरही भृंगराज अतिशय फायदेशीर असते. याचा उपयोग कधी आणि कसा करायचा यासाठी डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घेणे आवश्यक आहे. कारण योग्य सल्ला न घेता या गोळ्या घेतल्यास त्याचा आरोग्यावर विपरित परीणाम होण्याचीही शक्यता असते.