Lokmat Sakhi >Beauty > Hairstyle Tips In Summer : उन्हाळ्यात लग्न-पार्टीला जायचं तर हेअरस्टाइलचे ३ पर्याय; गरमही होणार नाही आणि दिसालही सुंदर

Hairstyle Tips In Summer : उन्हाळ्यात लग्न-पार्टीला जायचं तर हेअरस्टाइलचे ३ पर्याय; गरमही होणार नाही आणि दिसालही सुंदर

Hairstyle Tips In Summer : घामाने होणारी चिकचिक आणि त्यात मेकअप, हेअरस्टाइल तर करावीच लागते. अशावेळी केस मोकळे न सोडता कोणत्या हेअरस्टाइल करता येतील याविषयी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2022 12:57 PM2022-04-13T12:57:22+5:302022-04-13T13:04:54+5:30

Hairstyle Tips In Summer : घामाने होणारी चिकचिक आणि त्यात मेकअप, हेअरस्टाइल तर करावीच लागते. अशावेळी केस मोकळे न सोडता कोणत्या हेअरस्टाइल करता येतील याविषयी...

Hairstyle Tips In Summer: 3 Hairstyle Options If You Want To Go To A Wedding Party In Summer; It will not be hot and it will look beautiful | Hairstyle Tips In Summer : उन्हाळ्यात लग्न-पार्टीला जायचं तर हेअरस्टाइलचे ३ पर्याय; गरमही होणार नाही आणि दिसालही सुंदर

Hairstyle Tips In Summer : उन्हाळ्यात लग्न-पार्टीला जायचं तर हेअरस्टाइलचे ३ पर्याय; गरमही होणार नाही आणि दिसालही सुंदर

Highlightsसध्या बाजारात रेडीमेड वेगवेगळ्या आकाराचे बन मिळतात, ते लावूनही छान सुटसुटीत हेअरस्टाइल करता येतात.तीन पेडी वेणीबरोबरच पाचपेडी वेणी, सागरवेणी असे बरेच प्रकार आपण करु शकतो.

उन्हाळा म्हटला की अंगाची लाहीलाही. सतत लागणाऱ्या घामाच्या धारांनी नकोसे होऊन जाते. त्यातच भर उन्हाळ्यात लग्न, मुंज, वाढदिवस आणि इतरही बऱ्याच कार्यक्रमांची आमंत्रणे असतात. अशावेळी आपल्याला या कार्यक्रमांना हजेरी लावावी तर लागतेच. त्यात भरजरी कपडे, दागिने, मेकअप आणि हेअरस्टाइल यांमुळे जीव आणखी घाबरा होऊन जातो. त्यातल्या त्यात वजनाला हलक्या साड्या आणि हलका मेकअप केला की जरा तरी आपण काही वेळ वावरु शकतो. एरवी आपण केस मोकळे सोडून त्याच्या वेगवेगळ्या हेअरस्टाइल करु शकतो Hairstyle Tips In Summer. पण उन्हाळ्याच डोक्यावर आहेत ते केस नको वाटतात तर ते मोकळे सोडणं दूरच. आता केस वर बांधायचे म्हणजे आपण काकूबाई दिसणार असंही अनेकींना वाटू शकतं. पण काही हटके हेअरस्टाइल आपला लूक न बिघ़डवता तो आणखी छान करतात. पाहूया केस वर बांधूनही करता येतील अशा काही खास हेअरस्टाइल...

(Image : Google)
(Image : Google)

१. हाय पोनी किंवा पोनी टेल

पोनी टेल म्हणजे स्पोर्टस वूमन बांधतात, हा लूक मॉडर्न लूकमध्ये गणला जातो. असा आपला समज असतो. पण गेल्या काही दिवसांत आपण अभिनेत्रींचा लूक पाहिला तर त्या अगदी सर्रास पोनी टेल बांधलेल्या दिसतात. सगळे केस एकसारखे घेऊन त्याचा थोड्या वरच्या बाजूला एक छान बो बांधला तर आपल्याला सुटसुटीत वाटते. यावर थोडे मोठे कानातले किंवा गळ्यातले घातले तर आपला लूक खुलून येतो. यासाठी केस थोडे सेट करण्याची आवश्यकता असते इतकेच. सध्या पोनीला बांधण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे रबर किंवा डिझायनर स्कार्फ उपलब्ध आहेत. केसांत सोडायच्या आणखी काही डिझायनर गोष्टींचाही आपण पोनी बांधल्यावर वापर करु शकतो. 

२. वेणी 

वेणी ही जुनी फॅशन झाली असं आपल्याला वाटत असलं तरी ही फॅशन आता पुन्हा इन आहे. वेणी बांधल्यामुळे केसांचा पसारा तर होत नाहीच पण पाठीवर रुळणारी ही वेणी पारंपरिक लूकवर दिसतेही छान. यामध्ये साध्या तीन पेडी वेणीबरोबरच पाचपेडी वेणी, सागरवेणी असे बरेच प्रकार आपण करु शकतो. पुढच्या बाजूने लहान आकाराच्या वेण्या घालून मागे एक मोठी वेणी घातली तर त्याचा लूक आणखीनच छान दिसतो. त्यामुळे आपले केस थोडे मोठे असलीत तर हा पर्याय उत्तम आहे. वेणीमध्ये लावायला खरी फुले किंवा खोट्या डिझायनर गोष्टींचा वापर ही वेणी आणखी खुलवण्यासाठी उपयुक्त ठरतात. 

(Image : Google)
(Image : Google)

३. स्टायलिश बन

आपण केस वर बांधायचे म्हटले की सामान्यपणे त्याचा आंबाडा बांधतो. पण त्यामुळे आपण काहीसे वयस्कर दिसू शकतो. अशावेळी साडीवर आपण आहोत त्यापेक्षा तरुण दिसायचे असेल तर आंबाड्याऐवजी काही हटके प्रकारचे बन हेअरस्टाइल आपण करु शकतो. सध्या युट्यूबवर अशाप्रकारचे बरेच व्हिडिओ अगदी सहज उपलब्ध असून हे व्हिडिओ पाहून आपले केस लहान असो किंवा मोठे आपण त्याची वरच्या बाजूला बांधायची सोपी हेअरस्टाइल करु शकतो. तुमचे केस लहान असतील तर सध्या बाजारात रेडीमेड वेगवेगळ्या आकाराचे बन मिळतात, ते लावूनही छान सुटसुटीत हेअरस्टाइल करता येतात.

Web Title: Hairstyle Tips In Summer: 3 Hairstyle Options If You Want To Go To A Wedding Party In Summer; It will not be hot and it will look beautiful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.