Join us  

Haldi kumkum : हळदी कुंकवासाठी मस्त नटून जायचंय पण वेळ नाहीये? कमी वेळेत सुंदर तयारी करण्यासाठी या घ्या टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 3:01 PM

Haldi kumkum : हळदी कुंकवाच्या कार्यक्रमावेळी आपण सगळ्यात आकर्षक आणि सुंदर दिसावं असं प्रत्येक महिलेला वाटतं.

मकर संक्रांत (Makar Sankranti) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. मकरसंक्रांतीनंतर घरोघरच्या बायका हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात.  तीळ गूळाचे लाडू बनवण्यापासून, वाण देण्यापर्यंत सगळ्याचीच लगबग असते. हळदी कुंकवाला मैत्रिणींच्या घरी जायचं असो किंवा आपल्याघरी इतर बायकांना बोलवणं असो. हळदी कुंकवाच्या कार्यक्रमावेळी आपण सगळ्यात आकर्षक आणि सुंदर दिसावं असं प्रत्येक महिलेला वाटतं. (Haldi kumkum Styling Tips) 

आजकाल तर इतर कार्यक्रमांप्रमाणे हळदी कुंकवासाठी एकत्र जमल्यानंतर महिला फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट करतात.  दागिने कोणते घालायचे, साडी कशी नेसायची मग केस मोकळे सोडूया की हेअरस्टाईल करूया अशा अनेक गोष्टींचं कन्फ्यूजन मनात सुरू असतं. म्हणूनच तुम्हाला झटपट तयारी करण्याासाठी उपयोगी येतील अशा काही टिप्स सांगणार आहोत. (Makar sankranti Haldi kuku Styling Tips) 

१) ऐनवेळी घाई नको म्हणून तुम्ही आधीच काही साड्या निवडून ठेवा. नेहमीच तुम्ही काठ पदराच्या साड्या नेसत असाल तर यावेळी वेगळी साडी ट्राय करू शकता किंवा पारंपारीक लूक करायचा असेल तर एखादी सिल्क किंवा काठा पदराची साडी निवडा. सध्या खणांच्या साडीचा ट्रेंड महिलांमध्ये खूप दिसून येतोय.  हळदी कुंकवाच्या समारंभासाठी तुम्ही खणाची साडी, पदरावर नथ असलेली, पारंपारीक हिरकणी किंवा आर्टिफिशल सिल्क साडीची निवड करू शकता.

२) जर तुम्ही वेगळा काही लूक करण्याच्या प्रयत्नात असाल तर काठा पदराच्या साडीवर सिल्वर ऑक्सिडाईज ज्वेलरी वेअर करा. अनेक अभिनेत्री सध्या अशा सिल्वर ज्वेलरी कॅरी करताना दिसून येतात. मंगळसुत्र, बांगड्या, नथसुद्धा त्याचप्रकारची निवडा. तुम्हाला ज्वेलरीच्या दुकानात अशा दागिन्यांचा संपूर्ण सेट विकत घेता येईल. जर तुम्हाला मोत्यांचे दागिने आवडत असतील हा सुद्धा एक उत्तम पर्याय आहे. पण जर तुम्ही मंगळसुत्र किंवा गळ्यातला हार मोत्यांचा निवडत असाल तर  कानातल्यांपासून बांगड्यांपर्यंत सगळे दागिने मोत्याचेच  घाला जेणेकरून मिसमॅच वाटणार नाही.

३) केसांचा नुकताच हेअर कट करून घेतला असेल  तर तुम्ही केस छान मोकळे ठेवू शकता. जर तुमचे केस जास्त पातळ दिसत असतील तर पुढच्या केसांवर पफ किंवा एका साईडला वेणी बांधून मागच्या केसांचा बन बांधा. बनभोवती तुम्ही फ्रेश गजरा गुंडाळू शकता किंवा अर्टिफिशिल फ्लॉवर्स, ब्रॉचसुद्धा लावू शकता.  तुमच्या साडीचं ब्लाऊज बोट नेक  असेल तर गळ्यात जास्त काही घालण्याची गरज लागणार नाही. केस मोकळे सोडून तुम्ही त्यावर मोठे कानातले घातले तरी लूक खुलून येईल. 

४) हळदी कुंकवाला जाताना शक्यतो ब्लॅक किंवा व्हाईट रंगाचं कॉम्बिनेशन टाळा. हे खूपच कॉमन दिसतं. त्यामुळे आकर्षक दिसण्यासाठी तुम्ही ब्राईट, सोबर कलर्स ट्राय करायला हवेत. जर तुमची साडी डार्क रंगाची असेल तर लिपस्टिक भडक लावू नका त्यामुळे तुम्ही जास्त मेकअप केलाय असं वाटू शकतं. डार्क शेडच्या साडीवर फिकट रंगाची लिपस्टिक निवडा. याऊलट जर तुमच्या साडीचा रंग लाईट असेल तर डार्क लिपस्टिकची निवड करू शकता. 

५) साडी चापून चोपून दिसण्यासाठी जिन्स किंवा लेगिन्सवर नेसण्याचा प्रयत्न करा. स्वतःला स्टायलिश लूक द्यायचा असेल तर साडीच्या वरच्या बाजूला बेल्ट ट्राय करू शकता. जर बेल्टचा ट्रेंडी आणि फॅशनेबल लुक असेल तर तुम्हाला परफेक्ट जीन्स साडीचा लुक मिळेल. 

टॅग्स :ब्यूटी टिप्समकर संक्रांतीखरेदी