जागा पालट किंवा उन्हात अधिक फिरल्याने हात काळपट पडतात. हिवाळ्यात देखील बहुतांश लोकांचे हात टॅन होतात.चेहरा सुंदर आणि ग्लोइंग करण्यासाठी सर्वच लोकं अनेक प्रकारचे क्रीम्स आणि प्रॉडक्ट्सचा वापर करतात, पण हातांची योग्य काळजी घेतली जात नाही. शरीराच्या इतर भागापेक्षा जास्त टॅनिंग हातांचं होतं. हा काळपटपणा आपण घरच्याघरी काही गोष्टींचा वापर करून दूर करू शकतो. यात कॉफीचा मुख्य समावेश आहे. कॉफी अनेक कारणांसाठी वापरली जाते. त्याचे फायदे अनेक आहेत. कॉफीचा वापर करा, हात सुंदर आणि कोमल बनवतील.
कॉफी आणि दही
दहीचे सेवन केल्याने शरीरात अनेक चांगले बॅक्टरियांचा समावेश होतो. हाताचा काळपटपणा दूर करण्यासाठी देखील दही मदत करेल. कॉफी पावडर, दही आणि गुलाबजल आवश्यक आहे. हे तिन्ही गोष्टी एका वाडग्यात एकत्र करून घ्या आणि ते व्यवस्थित मिसळा आणि किमान २० मिनिटे हातावर चांगले लावा. ते सुकल्यावर हात धुवा. त्यानंतर हाताला मॉइश्चरायझर लावा. ही प्रक्रिया महिन्यातून दोन ते तीन वेळा करा. रिझल्ट लवकर दिसेल.
कॉफी आणि मध
एका भांड्यात थोडी कॉफी पावडर, मध आणि गुलाबपाणी टाका. नंतर तिन्ही गोष्टी नीट एकत्र मिसळा आणि पेस्ट तयार करा. ही पेस्ट १५ मिनिटे हातावर लावून ठेवा. त्यानंतर साध्या पाण्याने हात धुवा. थोड्या वेळानंतर हात मुलायम आणि सुंदर दिसेल.
कॉफी आणि लिंबू
कॉफी आणि लिंबूची पेस्ट तयार करण्यासाठी कॉफी पावडर, लिंबाचा रस आणि गुलाबपाणी लागेल. ते बनवण्यासाठी एका भांड्यात कॉफी पावडर, लिंबाचा रस आणि गुलाबपाणी एकत्र करून व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेली पेस्ट हातावर किमान २५ मिनिटे लावा, नंतर धुवा.
कॉफी आणि ऑलिव्ह ऑईल
एका भांड्यात एक चमचा कॉफी आणि ऑलिव्ह ऑईल घ्या, हे मिश्रण मिक्स करा आणि पेस्ट बनवा. ही पेस्ट हातावर लावा आणि १५ ते २० मिनिटे ठेवा. हे मिश्रण सुकल्यानंतर हात पाण्याने स्वच्छ धुवा. हातातील टॅनिंग दूर करण्यासोबतच त्वचा मुलायमही बनते. हवे असल्यास तुम्ही हा पॅक बनवून चेहऱ्यावरही लावू शकता.