तीळ आणि चामखीळ हे दोन प्रकार प्रत्येकाच्या शरीरावर आढळून येतात. मात्र चेहऱ्यावर जर तीळ आणि चामखीळ असेल तर सौंदर्य बिघडू शकते. काहींना चेहऱ्यावर तीळ आवडतात तर काहींना नाही. चेहऱ्यावर तीळ किंवा चामखीळ नको असेल तर फक्त लसणाचा वापर करून ते कमी करता येऊ शकतात.
बॅडेजसह लावा लसूण
तीळ अथवा चामखीळ काढण्यासाठी लसणाचा वापर उत्तम ठरेल. लसणाचे बारीक काप करून घ्या. हे तीळ व चामखीळवर लावून ठेवा. त्यावर बँडेज लावा, किमान ४ ते ५ तास काढू नका. ५ तास झाल्यानंतर बँडेज काढा. आणि थंड पाण्याने धुवून टाका. हळू हळू तीळ आणि चामखीळ निघून जाईल. उत्तम रिझल्टसाठी ही प्रक्रिया आठवड्यातून ३ वेळा करा.
लसूण व्हिनेगर पेस्ट
तीळ आणि चामखीळ काढण्यासाठी लसणाची चांगली पेस्ट तयार करा. त्या पेस्टमध्ये व्हिनेगर मिक्स करून चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट चामखीळ अथवा तिळावर लावा. ३० मिनिटे ती पेस्ट तशीच राहू द्या. शेवटी थंड पाण्याने पेस्ट धुवून घ्या.
कांदा आणि लसूण
कांदा आणि लसणाचे मिश्रण तीळ काढण्यास मदत करते. कांदा आणि लसणाची पेस्ट तयार करा. या पेस्टचा रस चामखीळ आणि तिळावर कापूस घेऊन लावा. साधारण १५ मिनिटे रस तिळावर राहू द्या. शेवटी थंड पाण्याने धुवून घ्या. यातून तिळाचे काळे डाग निघून जातील.