Lokmat Sakhi >Beauty > माधुरी दीक्षितची ९० हजारांची साडी पाहिली? खास काय? रेशमाच्या रेघांची कारागिरी कमाल..

माधुरी दीक्षितची ९० हजारांची साडी पाहिली? खास काय? रेशमाच्या रेघांची कारागिरी कमाल..

बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दिक्षित नेने Madhuri Dixit हिची बेबी पिंक रंगाची साडी सध्या सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. साडीवरची रेशमी कलाकारी सध्या नेटकरी मंडळींचं लक्ष वेधणारी ठरली आहे. तब्बल अडीच लाख लोकांनी माधुरीचे फोटो लाईक केले आहेत. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2021 05:10 PM2021-11-14T17:10:48+5:302021-11-14T17:12:55+5:30

बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दिक्षित नेने Madhuri Dixit हिची बेबी पिंक रंगाची साडी सध्या सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. साडीवरची रेशमी कलाकारी सध्या नेटकरी मंडळींचं लक्ष वेधणारी ठरली आहे. तब्बल अडीच लाख लोकांनी माधुरीचे फोटो लाईक केले आहेत. 

Have you seen Madhuri Dixit Nene's sari worth Rs 90,000? What's new in that ethanic wear saree? .. | माधुरी दीक्षितची ९० हजारांची साडी पाहिली? खास काय? रेशमाच्या रेघांची कारागिरी कमाल..

माधुरी दीक्षितची ९० हजारांची साडी पाहिली? खास काय? रेशमाच्या रेघांची कारागिरी कमाल..

Highlightsसाडीवरची रेशमी कलाकारी सध्या नेटकरी मंडळींचं लक्ष वेधणारी ठरली आहे. तब्बल अडीच लाख लोकांनी माधुरीचे फोटो लाईक केले आहेत. 

माधुरी दिक्षित हल्ली चित्रपटांपेक्षा सोशल मिडिया आणि छोट्या पडद्यावरच अधिक दिसते. पण असं असलं तरी तिची हेअरस्टाईल, ड्रेसिंग स्टाईल मात्र जबरदस्त कॉपी केली जाते. माधुरी सध्या सोशल मिडियावर खूप जास्त ॲक्टीव्ह असते. तिचे वेगवेगळ्या कपड्यांचे फोटो शूट तिचे फॅन्स आवर्जून बघतात आणि त्याला फॉलोही करतात. सध्या माधुरीने तिचे असेच काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये माधुरी साडी नेसली असून पुर्णपणे ट्रॅडिशनल लूकमध्ये आहे. माधुरीची ट्रॅडिशनल लूक स्टाईल परफेक्ट जमून आली असून तुम्हीही लवकरच येणाऱ्या लग्नसराईमध्ये अशी हटके स्टाईल करू शकता.

 

माधुरीची प्रत्येक साडी खासच असते. 'हम आपके है कौन' चित्रपटातली तिची जांभळी बॅकलेस ब्लाऊजवाली साडी अजूनही अनेक जणी विसरलेल्या नाहीत. असेच तिचे साड्यांचे कलेक्शन अफलातून असून आता आणखी एक साडी तिच्या या कलेक्शनमध्ये भर टाकणारी ठरली आहे. माधुरीने इन्स्टाग्रामवर तिच्या या साडीचे काही फोटो शेअर केले आहेत. एका जाहीरातीसाठी माधुरीने ही साडी नेसली आहे. साडीचा रंग बेबी पिंक असून माधुरीवर तो खूपच शोभून दिसतो आहे. सहसा सिल्कची साडी नेसायची असेल, तर बेबी पिंक रंग घेणे आपण टाळतो. काठापदराची किंवा सिल्कची साडी म्हटली की डार्क रंग निवडण्याकडे आपला कल असतो. सावळ्या किंवा गोऱ्या रंगावरही काठपदर साडीतले बेबीपिंक सारखे फिके रंग शोभतील का, असा प्रश्न बऱ्याच जणींना पडतो. पण तुमच्या मनातली ही शंका दूर करण्यासाठी माधुरीचे हे बेबीपिंक साडीतले आकर्षक फोटो नक्की बघा. तिचे फोटो पाहून तुम्हीही काठपदर साडीचे रंग निवडताना नक्कीच असे काही हटके रंग आवर्जून बघाल.

 

आहे कशी माधुरीची साडी....
नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरलेली माधुरीची ही साडी तब्बल ९० हजारांची आहे बरं का... इंडियन इथनिक वेअर या ब्रॅण्डने ही साडी डिझाईन केली आहे. या संपूर्ण साडीवर गोल्डन थ्रेडने वर्क केले आहे. साडीचा पदर आणि काठ याच्यावर अतिशय हेवी वर्क केलेले असून साडीच्या मधल्या भागात पुर्णपणे बुटी एम्ब्रॉयडरी दिसत आहे. साडीचा रंग अतिशय ग्लॉसी असून त्याची चमक जणू माधुरीच्या चेहऱ्यावरही दिसत आहे. ही साडी एवढी हेवी वर्कची असल्यामुळेच तिची किंमत लाखाच्या घरात गेली आहे. 

मलायका अरोराने दिवाळीत नेसलेली ही Fuschia pink रंगाची साडी; ऑनलाईन स्वस्तात मस्त उपलब्ध...

 

साडीचा काठ मोठा आणि भरगच्च असल्याने माधुरीने गळ्यात कोणताही दागिना घातलेला नाही. कानातले तिचे झुमके मात्र चांगलेच लांब असून ते चक्क तिच्या खांद्यावर रेंगाळलेले आहेत. डाव्या हातातल्या मध्यल्या बोटात एक मोठी अंगठी आणि उजव्या हातात एक बांगडी एवढेच काय ते दागिने माधुरीने या साडीवर घातले आहेत. तरीही तिचा लूक अतिशय परफेक्ट आणि ग्लॅमरस दिसतो आहे. केसांचा मधोमध भांग पाडून माधुरीने मानेवर रुळणारा जो अंबाडा घातला आहे तो तिची जॉ- लाईन अधिक परफेक्ट करणारा ठरला आहे. साडीचे ब्लाऊजही बेबी पिंक रंगाचे असून माधुरीने त्याच्या बाह्या हाताच्या कोपऱ्यापर्यंत लांब ठेवल्या आहेत.

 

Web Title: Have you seen Madhuri Dixit Nene's sari worth Rs 90,000? What's new in that ethanic wear saree? ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.