तुरटीच्या (Turti) दगडामुळे चेहऱ्याला बरेच फायदे मिळतात. हा एक पारदर्शी पदार्थ आहे ज्याचे आरोग्याच्या दृष्टीने अनेक फायदे आहेत. सौंदर्यतज्ज्ञ शुमिताकर यांच्या म्हणण्यानुसार तुरटीत असे अनेक गुण असतात ज्यामुळे पिंपल्स, एक्ने आणि त्वचेशी संबंधित समस्या उद्भवत नाहीत. तुरटीत एंटी बॅक्टेरिअल आणि एंटी इंफ्लेमेटरी गुण असतात ज्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स आणि एक्ने येत नाहीत. ज्यामुळे त्वचेची छिद्र साफ होऊन त्यातून घाण आणि तेल काढून टाकण्यास मदत हहोते. ज्यामुळे पिंपल्सची समस्या नियंत्रणात आणण्यास मदत होते. (Health Alum White Shiny Stone Brighten Face)
नेट मेड. कॉमच्या रिपोर्टनुसार तुरटीत एंस्ट्रिंजट गुणधर्म असतात. ज्यामुळे ओपन पोर्स कमी होण्यास मदत होते, त्वचेवरील पिंपल्सही कमी होतात. स्किन टाईटनिंगसाठी तुरटी उत्तम उपाय आहे. यात एंटी एजिंग प्रोपर्टीज असतात. ज्यामुळे रिंकल्स, फाईन लाईन्स कमी होण्यास मदत होते. त्वचेचा कोरडेपणा कमी होतो. त्वचा लाल होत नाही.
तुरटीचा वापर त्वचेचा पोत सुधारण्यासाठी केला जातो. ज्यामुळे त्वचेचे उघडलेले छिद्र छोटे होण्यास मदत होते. ज्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या, फाईन लाईन्स येत नाही. ज्यामुळे त्वचा टोन आणि फर्म होण्यास एक प्राकृतिक उपाय आहे. तुरटीचा वापर करून तुम्ही त्वचेचं टॅनिंग आणि डार्क स्पॉट्स काढून टाकू शकता. याच्या नियमित उपयोगानं चेहऱ्याचा रंग सुधारण्यास मदत होते. त्वचेवर काळे डाग दिसत नाहीत हळूहळू डाग हलके होऊ लागतात.
तुरटीतील एंटी बॅक्टेरिअल गुण त्वचेला संक्रमणापासून वाचवण्यास मदत करतात. ज्यामुळे बॅक्टेरिया आणि अन्य हानीकारक सुक्ष्मजीवांना मारता येते. ज्यामुळे त्वचेच्या समस्यांचा धोका कमी होतो. तुरटीचा वापर साधारणपणे शेविंगनंतर केला जातो. त्वचेवर कोणतेही छोटी जखम झाली असेल किंवा रक्तस्त्राव होत असेल तर तुरटीच्या वापरानं ते लवकरात लवकर बरं होण्यास मदत होते. आणि त्वचेचा शितलला मिळते.
तुरटीचा वापर करणं खूपच सोपं आहे. एक छोटी तुरटी पाण्यात घालून चेहऱ्यावर लावू शकता. काही मिनिटं तसंच ठेवल्यानंतर चेहरा सामान्य पाण्यानं धुवून घ्या. आठवड्यातून २ ते ३ वेळा हा उपाय केल्यास त्वचेची चमक वाढते आणि समस्यांपासूनही आराम मिळतो. तुरटी एका टोनरप्रमाणे काम करते. स्किन इरिटेशनचा त्रासही उद्भवत नाही.