महाराष्ट्रातील बहुतांश प्रांतात कडूलिंबाचे झाड आढळते. बहुगुणी कडूलिंबाचे झाड आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. कडूलिंबाची पानं कडवट असल्यामुळे बरेच लोकं खाणं टाळतात. पण याच्या सेवनाने आरोग्याच्या निगडीत अनेक गंभीर समस्या दूर होतात. शिवाय याचा वापर आपण केस आणि त्वचेसाठी देखील करू शकता (Beauty Tips). सध्या काही भागात उकाडा जाणवत आहे. हवामानात बदल घडल्याने स्किनवर याचा दुष्परिणाम दिसून येतो.
मुख्य म्हणजे चेहऱ्यावर पिंपल्स येतात. ज्यामुळे सौंदर्यात बाधा निर्माण होते (Skin Care). जर आपण स्किनच्या निगडीत अनेक समस्यांपासून त्रस्त असाल तर, कडूलिंबाचा वापर करून पाहा. याच्या वापराने नक्कीच फायदा होईल(Health benefits of bathing with neem infused water).
पिंपल्सपासून मिळेल सुटका
हिवाळ्यात जर आपण कडूलिंबाच्या पाण्याने आंघोळ केली तर, याचा फायदा स्किनला होईल. याचा वापर थेट न करता, उकळत्या पाण्यात कडूलिंबाची पानं घाला. ५ मिनिटानंतर कडूलिंबाचे पाणी आंघोळीच्या पाण्यात मिसळून आंघोळ करा. यामुळे पिंपल्सची समस्या कमी होते. यासह केसांची देखील समस्या दूर होते. मुख्य म्हणजे शरीरातील नैसर्गिक तेल संतुलित राहते.
केमिकल डायमुळे केस गळतात? करून पाहा नारळाच्या शेंड्यांचा वापर; केसांवर चढेल नैसर्गिक रंग
कडूलिंबामधील गुणधर्म
कडूलिंब हे अनेक समस्यांवर गुणकारी ठरणारे औषध मानले जाते. त्यात फॅटी अॅसिड्स, लिमोनॉइड्स, व्हिटॅमिन-ई, अँटीऑक्सीडेंट्स आणि कॅल्शियम आढळते. ही सर्व तत्वे त्वचेवर अत्यंत गुणकारी ठरतात. शिवाय आपली त्वचा स्किन इन्फेक्शन मुक्त होईल. जर आपण स्किनच्या अनेक समस्यांपासून त्रस्त असाल तर, तज्ज्ञांचा सल्ला घेऊन याचा वापर करा.
त्वचेच्या समस्येवर कडूलिंबाचा वापर कसा करावा?
- जर आपली त्वचा खूप कोरडी असेल तर, कडूलिंबाचे तेल लावा.
- चेहऱ्यावरील सुरकुत्या रोखण्यासाठी कडुलिंबाचे तेल व त्याच्या पानांचा लेप नक्की लावा.
ब्रायडल गोल्डन ग्लो हवाय? मग मधात मिसळा २ गोष्टी; दिसाल इतके सुंदर की..
- मुरुमांचे काळे डाग जर काही केल्या निघत नसेल तर, डागांवर कडूलिंबाचा लेप लावा.
- जखमांचे डाग घालवण्यासाठी नैसर्गिक उपाय म्हणजे कडूलिंबाचा लेप.
- जर वारंवार चेहऱ्यावर पिंपल्स येत असतील तर, चेहऱ्यावर कडूलिंबाची पानं चोळावीत.